मनपा वरिष्ठ लिपिक गणेश काळे यांची चौकशी करा… पाकिस्तानी,बांगलादेशी नागरिकांच्या विवाह नोंदणी केल्याचा आरोप… गणेश काळे व वरिष्ठांच्या मालमत्तेची व कामकाजाची चौकशी करण्याची सामाजिक कार्यकर्ते दया सरोदे यांची मागणी… तक्रारदाराच्या तक्रारीला अधिकाऱ्यांची केराची टोपली…

SHARE NOW

पुणे

गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेत कर्मचारी म्हणून कार्यरत असणारे गणेश काळे यांच्यावर अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले असताना मनपा प्रशासन या कर्मचाऱ्यावर एवढे मेहरबान का? आहे असा सवाल उपस्थित झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून गणेश काळे हे पगारासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत कार्यरत आहेत परंतु प्रत्यक्ष कामासाठी मात्र पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य मुख्य खात्याकडे ते कार्यरत आहेत.

 

सदर कर्मचारी यांची कामासाठी नेमणूक आरोग्य खात्यात असताना त्यांना वानवडी या ठिकाणी विवाह नोंदणी साठी कोणी आणि कशासाठी घेतले यामध्ये कोणाच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांची ऑर्डर काढण्यात आली याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

आरोग्य खात्याच्या कार्यालयीन कामकाजासाठी स्टाफ नर्स व इतर पाच ते सहा लेखनिक,बिगारी मुकादम यांची सर्व टीम मदतीला असताना गणेश काळे या कर्मचाऱ्यांची एवढी गरज का भासली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य खात्यातील स्टाफ नर्स हे पद हॉस्पिटल मधील पेशंटची देखभाल करण्यासाठी असायला हवे होते परंतु या स्टाफ नर्स या पदाचा वापर कार्यालयात विवाह नोंदणीच्या कामासाठी कारकुनी कामासाठी केला जातो असा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे.

 

विवाह नोंदणी कार्यालयाच्या प्रमुख असलेल्या घाडगे मॅडम या संपूर्ण पुणे शहरातील विवाह नोंदणीच्या सर्व नोंदी याच कार्यालयात कशा घेतात? याबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

पुणे शहरातील विवाह नोंदणीच्या भयंकर तक्रारी प्राप्त असताना पुन्हा पुन्हा तेच तेच प्रकार महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्याकडून घडत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.

 

अनेक बांगलादेशी नागरिक हे राहण्यासाठी एका ठिकाणी तर नोंद करण्यासाठी घाडगे मॅडमच्याच कार्यालयात हजर होतात. यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर एजंट व गणेश काळे यांचा हात असल्याचा आरोप होत आहे.

Advertisement

 

महानगरपालिकेच्या इतिहासातील ही पहिली केस असून वरिष्ठांच्या आर्थिक व्यवहारापोटी खास माणसाची नियुक्ती केली असल्याचे आरोप तक्रारदार यांनी केले आहे.

 

पुणे शहरात सध्या बांगलादेशी नागरिकांच्या देखील विवाह नोंदणी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहारातून केल्या असल्याची माहिती तक्रारदाराने दिली आहे.

 

कात्रज, हडपसर,वानवडी या ठिकाणच्या नोंदी त्या त्या हद्दीत होणे गरजेचे असताना त्या नोंदी यांच्याच कार्यालयात मोठ्या आर्थिक व्यवहारातून केल्या जात असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

 

सदर कार्यालयात एजंटाचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढला असून कार्यालयीन वेळेनंतर देखील नोंदी घेतल्या जात असल्याचा आरोप केला आहे.

 

सदर गणेश काळे यांची तात्काळ बदली ऑर्डर करावी व तो जिथे कार्यरत आहे तिथे त्याची रवानगी करण्यात यावी.

 

गणेश काळे यांनी यांच्या काळात झालेल्या सर्व विवाह नोंदणीची चौकशी करावी,त्यासाठी चौकशी समितीची नेमणूक करावी.

 

सदर गणेश काळे, घाडगे मॅडम यांची मालमत्तेची चौकशी करण्यात यावी.अफगाणिस्तान,बांगलादेश देशविघातक कृत्य करणाऱ्या अनेक नोंदी या ठिकाणी झालेल्या आहेत. ही संपूर्ण भारत देशासाठी धोक्याची घंटा आहे यामुळे भविष्यात देशावर मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तात्काळ चौकशी समितीची नेमणूक करावी आणि घाडगे मॅडम व गणेश काळे यांची चौकशी करावी.

 

सर्व कागदपत्रांची बारकाईने तपासणी करावी.गेल्या चार ते पाच वर्षातील नोंदी कोणी व कशा केल्या? त्याबाबतची कागदपत्रे कुठे आहेत?हे तपासून घ्यावे.

 

सदर कागदपत्र आपल्या कार्यलयात आढळून येणार नाहीत.कारण ती सर्व कागदपत्र गणेश काळे यांनी कार्यालयातून गायब केले असल्याचे माहिती मिळत आहे. सदर बाब ही अतिशय गंभीर स्वरूपाची असून यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी.आपल्या माध्यमातून तात्काळ कारवाई व्हावी अन्यथा नगर विकास खाते यांच्याकडे हे प्रकरण देऊन उचित कारवाई करावी अशी मागणे तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते दया सरोदे यांनी केली आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page