अलंकापुरीत आमलकी एकादशी दिनी भाविकांची दर्शनास गर्दी श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्पसजावट ; इंद्रायणी आरती उत्साहात

SHARE NOW

आळंदी  :

आळंदी येथील आमलकी एकादशी दिनी माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पन्नास हजारावर भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. एकादशी दिनी भाविकांनी मंदिर, नगरप्रदक्षिणा करीत हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. मंदिरातील श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावटीने श्रींचे रूप लक्षवेधी दिसत होते. इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समिती आळंदीचे वतीने इंद्रायणी आरती उत्साहात झाली. यावेळी ग्रामस्थ, महिला भाविकांची उपस्थिती होती.

आळंदी मंदिरात भाविकांनी परंपरेने एकादशी दिनी गर्दी करीत श्रींचे दर्शन घेतले. एकादशी दिनी श्रींचे मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आला. यावेळी आळंदी संस्थानचे पदाधिकारी, व्यवस्थापक, कर्मचारी, सेवक, मानकरी, पुजारी, कर्मचारी आदि उपस्थित होते. भाविकांना श्रींचे मंदिर दर्शनास कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था व्यवस्थापक माउली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने यांनी सेवक, कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पोलीस कर्मचारी यांचे सहकार्याने केली. मंदिरात दुपारचा फराळाचा महानैवेद्य, वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने परंपरेने प्रवचन, रात्री धुपारती परंपरेने झाली. श्रींचे दर्शन, प्रदक्षिणा पूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानास तसेच आचमनास गर्दी केली. आळंदी मंदिरात भाविकांनी धुपारतीस गर्दी केली. मंदिरात एकादशी दिनीच धार्मिक कार्यक्रम परंपरेने झाले.

या मध्ये मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्ता वरील पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले. यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस कर्मचारी यांनी आळंदीतील वाहतुकीचे सुरळीत नियोजन परिश्रम पूर्वक केले. आळंदीत सुरक्षित, सुरळीत वाहतूक राहावी यासाठी आळंदी दिघी वाहतूक पोलीस शाखेने कामकाज पाहिले. आळंदीतील रहदारीची वर्दळ पाहता येथे वाहतुकीचे केलेले प्रभावी नियोजन यामुळे भाविक, नागरिक यांना वाहतुकीचे कोंडीतून एकादशी दिनी सोय झाली. आळंदीत भाविकानी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले.

Advertisement

आळंदीत बेकायदेशीर वाहन पार्किंग आणि बेशीस्त वाहन चालकांवर कारवाई सुरु आहे. कारवाई टाळण्यासाठी आळंदीत रस्त्यावर वाहने पार्क करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. आळंदीत बांधकाम परवानगी देताना मंजूर प्लॅन आणि प्रत्येक्षात झालेले बांधकाम आणि यात पार्किंगच्या जागांचा गैर वापर होताना आढळून आल्यास करावा करण्याचा इशारा नगरपरिषदेचे वतीने देण्यात आला आहे. या साठी फेर सर्व्हे करून पार्किंगच्या जागा पार्किंग साठी वापरल्या जाण्यासाठी दक्षता घेण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. आळंदीत पार्किंग रस्त्याचे दुतर्फ़ा न करता इमारती खालील पार्किंगचे जागेत वाहने पार्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अलंकापुरीत एकादशी दिनी इंद्रायणीची आरती उत्साहात

येथील इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ, ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. दर एकादशी दिनी इंद्रायणी आरती सेवा समिती आळंदी तर्फे आरती सेवा रुजू करण्यात येते. यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा संयोजक अनिता झुजम, अनिता शिंदे, नीलम कुरधोंडकर, कौशल्या देवरे, सरस्वती भागवत, शोभा कुलकर्णी, पुनम नागरे, कमल जोशी, शकुंतला फड, तारामती गोरे, संगीता देवकर, सुरेखा कुऱ्हाडे, सरूबाई मुंडे, ज्योती कोळेकर, सोनाली कोळेकर, गोविंद ठाकूर यांच्यासह पंचक्रोशीतील महिला भगिनी, भाविक उपस्थित होते.

इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्यासाठी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले असल्याचे अनिता झुजम यांनी सांगितले. इंद्रायणी नदीचे प्रदूषण मुक्तीसाठी सुरु असलेल्या उपक्रमात सर्वाना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रमात सर्वानी सहभागी होऊन इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ कामकाज सुरु करण्याची गरज असल्याचे इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने संयोजक अनिता झुजम,अर्जुन मेदनकर यांनी आवाहन केले आहे. उपस्थित मान्यवरांचे हस्ते इंद्रायणीची आरती नंतर पसायदान, प्रसाद वाटप उत्साहात झाले. तत्पूर्वी इंद्रायणी सेवा समितीचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता करण्यात आली. यावेळी भाविक देखील उपस्थित होते. आळंदीतील इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे उपक्रमात सर्वानी सहभागी होऊन जल संवर्धनाचे एल्गार मध्ये सहभागी होण्याचे आवाहन सेवाभावी संस्था आणि सेवा भावी कार्यकर्ते यांना करण्यात आले असून यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. इंद्रायणी आरती सेवा समितीचे पुढाकाराने सुरु झालेल्या इंद्रायणी आरतीचे उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. हे कार्य अधिक वाढावे यासाठी आळंदी देवस्थानने आरती उपक्रम वेगळा सुरु करून इंद्रायणी आरती सेवा समितीचे कार्य पुढे नेले असल्याचे अनिता झुजम यांनी सांगितले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page