संत गाडगेबाबा जयंती निमित्त पैसाफंड प्राथमिक शाळेत स्वच्छता रॅली
तळेगाव दाभाडे :
सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी संत गाडगेबाबा जयंती निमित्त स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.अनिता लादे मॅडम शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री.विठ्ठल दरेकर सर यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील शिपाई म्हणजे स्वच्छता कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.अनिता लादे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व समजून सांगितले. शाळेच्या सहशिक्षिका सौ लबडे मॅडम यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितले त्यानंतर स्वच्छता शपथ घेण्यात आली.
यानंतर विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ ‘स्वच्छ गाव सुंदर गाव ‘अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडले रॅली शाळेपासून सुरू होऊन परिसरातील प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आली विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन विद्यार्थ्यांनी नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला.
रॅली नंतर विद्यार्थ्यांनी शाळा व परिसर स्वच्छ करण्याचे प्रत्यक्ष कामही केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण झाली कार्यक्रमाचे आयोजन सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले.






