चऱ्होली – देहू – आळंदीत महास्वच्छता अभियानचा एल्गार पुणे जिल्ह्यात एकाच दिवशी ४२ ठिकाणी जल स्वच्छता अभियान उत्साहात जल संवर्धन – स्वच्छतेस संत निरंकारी मिशनचे विशेष योगदान पिंपरीचे महापौर रवी लांडगे यांचा थेट सहभाग
आळंदी :
चऱ्होली – देहू – आळंदीत महास्वच्छता अभियानचा एल्गार करीत जल संवर्धन – स्वच्छतेस संत निरंकारी मिशनचे विशेष योगदान प्रत्येक्ष कृतीतून दिले आहे. पुणे जिल्ह्यात एकाच दिवशी ४२ ठिकाणी जल स्वच्छता अभियान उत्साहात राबवित जल संवर्धन – स्वच्छतेस संत निरंकारी मिशनने विशेष योगदान दिले. या उपक्रमा नंतर आळंदीत दुसर्या सत्रात पिंपरीचे महापौर रवी लांडगे यांचा हि थेट सहभाग झाला.
या उपक्रमात विविध सेवाभावी संस्थानसह सात मावळे संवर्धन संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक तसेच आळंदी नगरपरिषद, पिंपरी महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी झाले. इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी अशा लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या मोहिमांना भविष्यात अधिक गती तसेच प्रोत्साहन दिले जाईल असे देखील महापौर रवी लांडगे यांनी यावेळी सांगितले.
गेल्या चार वर्षा पासून आळंदीसह परिसरात संत निरंकारी मिशन चे वतीने देशात विशेष स्वच्छता अभियान व जल संवर्धनाचे कार्य सुरु आहे. जेव्हा सेवा हीच साधना ठरते आणि निसर्गा विषयी संवेदनशीलता जीवनाचा मूलमंत्र बनते, तेव्हा समाजाला नवी दिशा देणारे पवित्र संकल्प जन्माला येतात. मानवसेवा व लोककल्याणाच्या या दिव्य भावनेला साकार रूप देत संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन रविवारी सकाळी ८ ते ११ वाजे पर्यंत उत्साहात करण्यात आले. परम श्रद्धेय सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज एवं निरंकारी राजपिता जी यांच्या पावन मार्गदर्शना खाली संपूर्ण भारत भर एकाच वेळी हे अभियान राबविण्यात आले.
या अभियाना अंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकरी, मिना, कऱ्हा, मांडवी, आनंदी या नद्यांसह शहरातील विविध तलाव अशा ४२ ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. या अभियानांतर्गत भोसरी विभागाचे वतीने चऱ्होली, देहू,आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या घाटांवर महास्वच्छता मोहीम राबविण्यात आले. या वेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे, आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, अनिकेत तापकीर, नगरसेवक सागर कुऱ्हाडे पाटील, गोविंद कुऱ्हाडे, किरण येळवंडे, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक सचिन तापकीर, निरंकारी मिशनचे सेवादार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत निरंकारी मंडळाचे नंदकुमार झांबरे यांनी माहिती देताना सांगितले की, हा विशाल उपक्रम देशभरातील १६०० हून अधिक ठिकाणी तसेच पुण्यामध्ये ४२ ठिकाणी एकाच वेळी या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
पाणी हे केवळ एक साधन नसून जीवनाचा आधार आणि ईश्वराची अमूल्य देणगी आहे त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे हि जागृती समाजामध्ये निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संत निरंकारी मिशनने बाबा हरदेव सिंह जी यांच्या प्रेरणादायी शिकवणी आत्मसात करून सन २०२३ मध्ये संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट अमृत’ची सुरुवात केली होती. जलसंवर्धन हा उपक्रम केवळ एखाद्या दिवसा पुरता किंवा मर्यादित मोहिमे पुरता न ठेवता, तो एक जीवनशैली, संस्कार आणि सेवाभाव म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा बनेल आणि जिथे स्वच्छ जलातून स्वच्छ मन आणि स्वच्छ समाज घडू शकेल.
सतगुरु माताजींचा संदेश सदैव हाच राहिला आहे की, आपण ही पृथ्वी पुढील पिढ्यांसाठी अधिक सुंदर, स्वच्छ आणि संतुलित स्वरूपात जपून ठेवली पाहिजे. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हे अभियान त्या पवित्र संकल्पाचे मूर्त स्वरूप आहे, जे समाजाला निसर्ग, समाज व आत्म्याशी जोडून करुणा, समतोल आणि सौहार्दपूर्ण भविष्याच्या दिशेने पुढे नेण्याचे काम करेल. स्वछता अभियान आणि सत्संग चे देखील आयोजन या वेळी झाले. बाहेरील स्वच्छते बरोबरच मनाच्या आंतरिक शुद्धीचा संदेश आध्यात्मिक विचार धारेतून देण्यात आला.
या उपक्रमात सात मावळे संवर्धन संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक तसेच पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी अशा लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या मोहिमांना भविष्यात अधिक गती तसेच प्रोत्साहन दिले जाईल असे महापालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी दुपारचे सत्रातील स्वच्छता अभियानात सांगितले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून इंद्रायणी नदीत प्रदूषण करणाऱ्या संबंधित कंपन्या व संस्थांवर प्रशासना मार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी प्रशासना सोबत नागरिकांनीही सामूहिक जबाबदारी स्वीकारून पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवि लांडगे, आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रशांत कु-हाडे यांच्या उपस्थितीत सात मावळे संवर्धन संस्थे मार्फत इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा मुख्य उद्देश इंद्रायणी नदी तील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधणे तसेच नदी स्वच्छते साठी सामूहिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा होता.
या स्वच्छता मोहिमे दरम्यान महापौर लांडगे यांनी स्वतः इंद्रायणी नदीच्या पात्रात उतरून स्वच्छता उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. प्रत्यक्ष पाहणी करताना नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर साचलेला कचरा, औद्योगिक सांडपाणी, प्लास्टिक कचरा तसेच इतर घातक घटकांची त्यांनी पाहणी करून नदीच्या प्रदूषणा मागील संभाव्य कारणांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला.
या पाहणी नंतर महापौर लांडगे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून इंद्रायणी नदीत सोडण्यात येणारे प्रदूषित सांडपाणी, औद्योगिक कचरा आणि पर्यावरणास हानिकारक घटक यांस जबाबदार असलेल्या संबंधित कंपन्या तसेच इतर संस्थांवर प्रशासना मार्फत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे इशारा दिला.
इंद्रायणी नदीचे पावित्र्य आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक यांनी एकत्रित पणे पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या शिवाय या स्वच्छता अभियाना मुळे नदी संवर्धनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले गेले असून भविष्यात अशा मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे ही प्रशासना तर्फे सांगण्यात आले. या स्वच्छता अभियानात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी देखील केले होते. आळंदी परिसरातील विविध सेवाभावी संस्था, सेवाभावी कार्यकर्ते, भाविक, नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.






