राधाकृष्ण विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.. सन 2026 आदर्श शिक्षक पुरस्कार “भाऊसाहेब तेलुरे” यांना प्रदान
पुणे
राधाकृष्ण विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम दोन दिवस मोठया उत्साहात साजरा झाला.
कात्रज-कोंढवा रोड,गोकुळनगर येथील मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे राधाकृष्ण पुर्व प्राथमिक, प्राथमिक,माध्यमिक व पिडीपी इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.यावेळी आदर्श शिक्षक २०२६ पुरस्कार भाऊसाहेब रामा तेलुरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भारत देशाची सांस्कृतिक परंपरेतील विविधतेत एकता आधारित विविध नृत्य प्रकार तसेच नाटिका, महाराष्ट्राची लोकधारा, संस्कृती, परंपरा यावर गाणी सादर करण्यात आले . शालेय व आंतरशालेय क्रीडा,वक्तृत्व,चित्रकला, बाह्य परीक्षामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी नगरसेविका रंजना टिळेकर, अरुण राजवाडे,प्रतिक कदम,पूजा कदम,वृषाली कामठे,अर्चना जगताप,रुपाली धाडवे,दिनेश धाडवे,नितीन शेठ चोरडिया,महावीर लोढा, संस्थेचे अध्यक्ष सुनील परदेशी, सचिव दिलीप परदेशी, मिलन परदेशी, अनिल परदेशी,नितेश परदेशी,सल्लागार प्रतिभा नाईक या उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नागनाथ काळे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक अरुण डमाळ, पिडीपीच्या मुख्याध्यपिका रचना परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.सांस्कृतिक विभाग प्रमुख अशोक शेंडगे आणि सुलतान शेख यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
यावेळी क्रीडा स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय स्पर्धेत सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी क्रीडा प्रमुख किरण घोरतळे सर, अश्विनी सुतार उपस्थित होते.






