जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडीत डिजिटल साक्षरता लॅबचे उद्घाटन

SHARE NOW

माळवाडी :

तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी येथे लेडी बॅमफर्ड फाउंडेशन यांच्या सहकार्याने दहा लॅपटॉप फर्निचरसह सात लाख रुपये खर्च करून शालेय विद्यार्थ्यांना जीवनात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षणाची नवी दिशा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या डिजिटल साक्षरता लॅबचा उद्घाटन सोहळा गुरुवार दि. १२ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास लेडी बॅमफर्ड फाउंडेशनचे श्री.हिमांशू सर आणि LBF टीम. मा. सौ. पल्लवी संदीप दाभाडे सरपंच / जिल्हा परिषद सदस्य व गटशिक्षणाधिकारी सौ. शिल्पा रोडगे, केंद्रप्रमुख श्री. भगवंता बनकर, मुख्याध्यापिका सौ सुनिता पोटे,ग्रामपंचायत सदस्य दीपक दाभाडे, पूजा दाभाडे, रेश्मा दाभाडे,विदुर पचपिंड तसेच पोलीस पाटील रवींद्र दाभाडे, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतगीताने करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापक सौ. सुनिता पोटे यांनी प्रास्ताविकातून डिजिटल शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले फाउंडेशन मार्फत संगणक शिक्षकाची सुविधाही उपलब्ध होणार आहे त्याबद्दल लेडी बॅमफर्ड फाउंडेशनला मनःपूर्वक धन्यवाद देण्यात आले. श्री हिमांशू सर यांनी डिजिटल साक्षरता लॅबच्या सहाय्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास प्रवृत्त करावे आणि शाळेला पुढे आणखीन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.सौ. शिल्पा रोडगे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून डिजिटल शिक्षण आधुनिकतेची कास धरत ज्ञान मिळवण्याची सोपी व जलद पद्धती असून डिजिटल साक्षरता लॅब माध्यमातून विद्यार्थ्यांना स्व अध्ययनाची सवय व कौशल्य विकास होण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद केले. सौ.पल्लवी दाभाडे यांनी डिजिटल साक्षरता लॅब मुळे विद्यार्थ्यांना संगणक व डिजिटल तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळण्यास मदत होणार आहे. शाळेत झालेला आमुलाग्र बदल, शालेय शिस्त आणि गुणवत्ता वाढ झाल्याबद्दल विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. उषा तट्टू मॅडम आणि आभार सौ.विजया खेडेकर मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page