अर्थशास्त्र विभागाचा NISM येथे शैक्षणिक अभ्यास दौरा संपन्न
तळेगाव दाभाडे
अर्थशास्त्र विभाग, इंद्रायणी महाविद्यालय, तळेगाव दाभाडे यांच्या वतीने दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी National Institute of Securities Markets (NISM), पनवेल येथे शैक्षणिक स्टडी टूरचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या अभ्यास दौर्यामध्ये महाविद्यालयातील कला व वाणिज्य विभागातील तसेच एम ए अर्थशास्त्र विभागातील एकूण ४५ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना शेअर बाजार, सिक्युरिटीज मार्केट, गुंतवणूक प्रक्रिया, आर्थिक साक्षरता तसेच वित्तीय व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यपद्धती समजावी यासाठी हँड्स-ऑन (प्रत्यक्ष) प्रशिक्षण देखील देण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वित्तीय व्यवहारांची व्यावहारिक माहिती मिळाली.
या दौर्यामध्ये अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सदाशिव मेंगाळ, डॉ. सत्यम सानप, स्टडी टूर समन्वयक डॉ. अर्चना जाधव तसेच प्रा. प्रणिता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन यशस्वीरीत्या पार पडले.
स्टडी टूरमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना NISM संस्थेकडून सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग व शिस्तबद्ध वर्तन यामुळे ही स्टडी टूर अत्यंत यशस्वी ठरली असून महाविद्यालय व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत अशा शैक्षणिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी अधिक ज्ञान मिळवावे, असे आवाहन केले. तसेच इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे, कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वित्तीय साक्षरता व ज्ञानवृद्धीची आवड निर्माण व्हावी आणि अशा शैक्षणिक उपक्रमांत सहभाग वाढावा यासाठी प्रोत्साहन दिले.






