कामशेत पवना चौकात बसथांब्यावर गॅरेजवाल्यांचे अतिक्रमण; नागरिकांमध्ये संताप
कामशेत : पवना चौकातील बस थांब्यावर स्थानिक गॅरेज मालकांकडून अतिक्रमण केल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. बस थांब्यावरील शेडवर गॅरेजवाल्यांनी अनेक टायर ठेवून सार्वजनिक जागेचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे.
या अतिक्रमणामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून बसथांब्याचे सौंदर्यही विद्रूप झाले आहे. शेडवर ठेवलेले टायर केवळ जागा अडवतात असे नाही. याच बस थांबा मध्ये वृद्ध लोकशाळेकरी विद्यार्थी अनेक प्रवासी या बस थांबा मध्ये बसलेले असतात मात्र शेड वरती ठेवण्यात आलेले टायर कधीही वाऱ्याच्या ओघाने खाली पडलेत तर भविष्यात मोठा अपघात घडू शकतो या अशा अतिक्रमण करणाऱ्या गॅरेज मालकावरती कारवाई करणार का?असा सवाल नागरिक करत आहेत.
नागरिकांनी संबंधित गॅरेज मालकाविरुद्ध तत्काळ कारवाई करून बसथांबा अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी प्रशासनाकडे करत आहे.स्थानिक प्रशासनाकडून या प्रकरणी कोणती कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चक्क बस थांब्याच्या शेड वरती एकावरती एक असे टायर रचून गॅरेज वाल्याने कमालच केली आहे मात्र हे टायर अचानक वाऱ्याच्या ओघाने जर खाली पडलेच तर या ठिकाणी मोठा अपघात घडू शकतो.
या अशा गॅरेज व्यवसायिकावरती प्रशासन कारवाई करणार का याकडे मात्र नागरिकांचे लक्ष लागले आहे.






