श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची ११ टक्के लाभांश जाहीर

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि २०.०९.२०२५ रोजी योगीराज मंगल कार्यालय येथे पार पडली. यावर्षी संस्थेच्या सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर केला. संस्थेच्या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे होते. याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी संस्थेच्या कार्याक्षमतेवर समाधान व्यक्त केले आधुनिक तंत्रज्ञान आणी बुद्धिमत्तेच्या जोरावर काहीही साध्या होऊ शकते या विषयावर आपले मत मांडले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रेशमाताई भोसले (अध्यक्ष पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे), भास्करराव म्हाळसकर (संस्थापक अध्यक्ष शिवजयंती उत्सव मावळ/मावळ विचार मंच), जनार्दन रणदिवे (चेअरमन पुणे पिपल्स सहकारी बँक पुणे), रेवणनाथ दारवटकर (संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे) बबनराव भोंगाडे (मा अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती, अंकुश आंबेकर (चेअरमन खादी ग्रामऊद्योग) उपस्थित होते. महिलांसाठी सुरु केलेली महिला सन्मान ठेव योजना व संस्थेमार्फत असलेल्या विविध योजनांची माहिती संतोष भेगडे संस्थेचे आधारस्तंभ (सचिव पुणे जिल्हा नागरी सह पतसंस्था फेडरेशन) यांनी दिली.

Advertisement

 

सूत्रसंचालन संस्थेचे सचिव अतुल राऊत यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे केले. अहवाल वाचन संस्थेचे संस्थेचे संचालक राहुल पारगे यांनी केले. संस्थेचे संचालक शंकर भेगडे यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यालय अद्यावत आर्किटेक प्रियांका भेगडे यांनी केल्यामुळे व गेल्या 25 वर्षा पासून संस्थेत कार्यरत असणाऱ्या व्यास्थापिका तस्लीम शिकीलकर आणि श्री समर्थकृपा महिला बचत गट स्वयंरोजगार महिला बचत योजनेत सक्रीय सहभाग दिल्याबद्दल यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी खजिनदार अमित भसे, उपाध्यक्ष समीर भेगडे, सल्लागार  विलास भेगडे आशिष खांडगे, अरविंद गद्रे, विजय भेगडे, प्रविण मुन्हे, सल्लागार चंद्रजीत वाघमारे, महेशभाई शहा, शाळीग्राम भंडारी, संजय ओसवाल सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भोमे, माजी अध्यक्ष सुरेश धोत्रे, माजी नगरसेवक रामभाऊ गवारे, शोभाताई भेगडे, रजनी ठाकूर, संजय वाडेकर, सविता मंचरे, व सभासद उपस्थित होते


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page