भोसरीत महिलांसाठी व्यवसाय वाढीसाठी एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा

SHARE NOW

भोसरी, ता. २० :

महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राजमाता जिजाऊ महिला महासंघ, ओजल मायक्रो सर्व्हिस फाउंडेशन आणि महाराष्ट्र विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम प्रभाग क्र. ५ मधील महिलांसाठी शनिवार, दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत सर्वे नं. २३०/१, धोंडिबा गणपत फुगे विरंगुळा केंद्र, दिघी रोड, भोसरी येथे पार पडला.

या कार्यशाळेत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि विद्यमान व्यवसाय वाढवण्यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. तसेच या कर्जांवर मिळणाऱ्या सबसिडीबाबतही डॉ. सी. जी. अपसिंगे (B.V.SC & A.H., माजी सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन) यांनी मार्गदर्शन केले.

Advertisement

आजच्या काळात व्यवसायासाठी सोशल मीडिया मार्केटिंगचे महत्व अधोरेखित करत महिलांना प्रत्यक्ष डिजिटल मिडियाचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी राजमाता जिजाऊ महिला महासंघाच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई अजित गव्हाणे यांनी महिलांना प्रोत्साहन देत योग्य दिशा दिली.

 

या कार्यक्रमाला ओजल फाऊंडेशन चे संस्थापक अमर शिंदे, सौ. प्रज्ञा शिंदे, तसेच सौ. ठोसर मॅडम यांची उपस्थिती लाभली.

 

प्रभाग क्र. ५ तसेच आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. महिलांना स्वावलंबनाच्या दिशेने प्रेरणा देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

 

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page