तीर्थक्षेत्र येलवाडी रस्ता आंदोलनाला यश – आमदार बाबाजीशेठ काळे यांच्या पाठपुराव्याने उपोषणकर्त्यांनी घेतले उपोषण सोडण्याचा निर्णय
येलवाडी:
तीर्थक्षेत्र येलवाडी येथे देहुंगाव ते देहुफाटा चाकण तळेगाव हवे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी व नव्याने बांधणीसाठी येलवाडी गावचे माजी सरपंच तळेगाव चाकण कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे यांच्या नेतृत्वामध्ये काल दिनांक 18/9/ 2025 रोजी अमरण उपोषण सुरू केले. पाठिंबा देण्याकरता आज तीर्थक्षेत्र येलवाडी येथे उपस्थित राहून श्रीक्षेत्र देहू देहूरोड शहर मंडल भाजपाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
तसेच खेड तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय बाबाजीशेठ काळे यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन उपोषणकर्त्यांनी हे उपोषण सोडले.
तसेच या उपोषणाला मावळ तालुक्याचे माजी आमदार माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी देखील काल भेट दिली त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले यांना फोन लावून सदर समस्येबद्दल माहिती दिली व त्या संदर्भात योग्य ते आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचे विनंती केली. त्यानुसार मंत्रिमहोदयांनी संबंधित विभागातील पीडब्ल्यूडी चे अधिकाऱ्यांना त्वरित खड्ड्यांवरती जेसीपीच्या साह्याने जीएसबी टाकून खड्डे भरून रोलिंग करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे आज दुपारी जीएसबी च्या गाड्या देखील साईट वरती आल्या व खड्डे बुजवण्याचे काम प्रत्यक्षात पीडब्ल्यूडी च्या वतीने सुरू झाले.
तसेच नवीन रस्त्याचे काम पीएमआरडी च्या माध्यमातून टेंडर झाले असून त्याची टेक्निकल बीड ओपन करण्यात आली आहे या आठवड्यात टेक्निकल व फायनान्शिअल क्वालिफिकेशन झाल्यानंतर कामाचे वर्कर देण्यात येईल व येत्या एक महिन्याच्या आत सर्व प्रोसिजर पूर्ण करून काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन पीएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी खेड तालुक्याचे विद्यमान आमदार बाबाजीशेट काळे यांना दिले त्यांच्या या शब्दानंतर आमदार साहेबांनी दोन्ही विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी फोन द्वारे संपर्क करून त्यांचे संपूर्ण संभाषण स्पीकर वरती उपस्थित ग्रामस्थ व नागरिकांना तसेच उपोषण कर्त्याना ऐकवले व त्या सर्वांच्या संभाषणातून उपोषण कर्ते व ग्रामस्थांचे समाधान झाल्यानंतर आमदार साहेबांनी उपोषण कर्त्याना उपोषण सोडण्याचे विनंती केली. त्या विनंतीचा मान ठेवून उपोषणकर्त्यांनी आमदार साहेबांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन उपोषण सोडले.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये
श्री.रघुवीर उद्धवराव शेलार
(श्री क्षेत्र देहू देहूरोड मंडल अध्यक्ष, माजी नगरसेवक देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड )
बाळासाहेब शेलार
(माजी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी देहूरोड )
संदीप सोमवंशी
माझे अध्यक्ष पुणे जिल्हा युवा मोर्चा
सुनील हगवणे
शहरप्रमुख शिवसेना देहू
सागर गाडे, चेतन बोत्रे, शिवाजी गाडे
एम डी चौधरी
(अध्यक्ष मानवी अधिकार महाराष्ट्र राज्य )
बाबू हिरेमेटकर
(मानवाधिकार उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य )
राकेश कुंचीकर
(भटके विमुक्त शहर अध्यक्ष )
दिनेश बालघरे
बाबू रामलू कोळी
(श्रीक्षेत्र देहू देहूरोड मंडल सचिव )
नारायण (तात्या )पचपिंड
(श्री क्षेत्र देहू देहूरोड मंडल सरचिटणीस)
रविंद्र काळोखे
(किसान आघाडी अध्यक्ष)
प्रधुम्न टिळेकर
(श्री क्षेत्र देहू देहूरोड मंडल सरचिटणीस)
सविता पिंजन
(भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष)
पल्लवी पिंजण
(भाजपा महिला मोर्चा कोषाध्यक्ष)
सरस्वती पिंजन
(भाजपा महिला मोर्चा सचिव)






