पैसा फंड काच कारखान्याच्या जमीन विक्रीस परवानगी देऊ नये: फुले- शाहू – आंबेडकर प्रतिष्ठानची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

SHARE NOW

तळेगाव दाभाडे: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी तळेगाव दाभाडे येथे पैसा फंड या ऐतिहासिक काच कारखान्याची उभारणी केली असून सध्याच्या विश्वस्त मंडळांनी

*६५एकरमधील ७हजार३४४चौरस मीटर जागा*

विक्रीसाठी काढली आहे. या ऐतिहासिक औद्योगिक निधी संस्थेची जमीन विक्रीला परवानगी देऊ नये, अशी मागणी

फुले – शाहू – आंबेडकर प्रतिष्ठानने एका लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

निवेदनावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष,ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभुळकर, सचिव जयंत कदम यांच्या स्वाक्षरी आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, जमिनी विक्रीसाठी सहधर्मदाय आयुक्त यांच्याकडे विश्वस्तांनी परवानगी मागितली आहे. जमीन विक्रीस प्रतिष्ठानचा तीव्र विरोध आहे. टिळकांनी निर्माण केलेल्या ऐतिहासिक वास्तूची पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल.

Advertisement

प्रतिष्ठानच्या वतीने तळेगावातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याचा प्रयत्न आहे.तळेगाव दाभाडे येथे लोकमान्य टिळकांनी क्रांतिकारकांना घडविण्यासाठी ६५ एकर जागा घेऊन नवीन समर्थ विद्यालयाची स्थापना केली . ऐतिहासिक पैसा फंड काच कारखान्याची निर्मिती केली. सध्याच्या विश्वस्त मंडळाकडून संस्था आर्थिक अडचणीत आहे असे दाखवून सह धर्मदाय आयुक्त यांची दिशाभूल करीत आहेत. पैसा फंड काच कारखान्याला रेल्वेच्या सिग्नलला लागणाऱ्या काचेची मागणी असताना संस्था आर्थिक अडचणीत का येते याचे गौड बंगाल अद्यापी कळलेले नाही.

लोकमान्य टिळकांनी निर्माण केलेल्या पैसा फंड काच कारखाना व जमीन या ऐतिहासिक ठेव्याची जपणूक होण्यासाठी  विश्वस्तांना ऐतिहासिक वास्तूच्या जमिनीची विक्री करण्याची परवानगी देऊ नये  ही विनंती.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page