*आदर्श विद्या मंदिरात लायन्स क्लबमार्फत शिक्षकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथे ‘दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी’ लायन्स क्लब तळेगाव तर्फे ,आदर्श विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे येथील 110 शिक्षकांना डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून ,
भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. माध्यमिक शिक्षकानी ईशस्तवन व स्वागतगीत
सादर केले.
लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री. राजेंद्र झोरे यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले . त्यांनी आपल्या भाषणात लायन्स क्लबच्या वतीने शिक्षकांना सन्मानित करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे असे नमूद केले .
मावळ शिक्षण प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष श्री.नंदकुमार काळोखे व सहसचिव प्रा.वसंत पवार यांनी संस्थेच्या प्रगतीचा व कार्याचा आढावा घेतला व शिक्षकांविषयी गौरवोद्गार काढले. शिक्षकांमुळे संस्थेचा शिक्षण दर्जा सतत उंचवतो आहे असे आवर्जून सांगितले. .
लायन महेश भाई शहा यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले .
उद्योजिका सीमा कांचन (कदम) यांनी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवताना ते आपल्या ज्ञानने ,प्रेमाने आणि संस्काराने त्यांचे जीवन उजवळतात असे सांगितले.
उपस्थितांमध्ये विभाग प्रमुख,
पूर्व व प्राथमिक :सौ प्रतिज्ञा मांडे , माध्यमिक :श्री संतोष खामकर ,
उच्च माध्यमिक: श्री संजय देवकर, सा. फुले महिला महाविद्यालय: सौ. माधुरी चंदनशिव हे उपस्थित होते.
प्रा. अंकलेश निसर्गंध यांनी स्वरचित गीत सादर केले .सेविका सौ.घोडके यांनी शिक्षक दिनपर गीत सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रशांत गुंड यांनी केले .
आभार प्रदर्शन सौ. प्रतिज्ञा मांडे यांनी केले.
लायन भरत पोद्दार लायन सुनील वाळुंज लायन डॉ. अनिकेत काळोखे लायन प्रमिला वाळूंज व सौ कुमुदिनी झोरे आदि मान्यवर उपस्थित होते .






