सोमाटणे फाटा येथे अथर्वशीर्ष पठण व महिला सन्मान सोहळा उत्साहात
सोमाटणे :
श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था शाखा सोमाटणे यांच्या वतीने गुरुवार, दिनांक 28 ऑगस्ट रोजी गोरक्षनाथ मंदिर येथे अथर्वशीर्ष पठणाचा सोहळा भक्तिभावाने संपन्न झाला.
सकाळी ७.३० वाजता श्री डोळसनाथ महाराज व श्री गणेशाचा अभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मोठ्या संख्येने महिला भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. एकूण ११ आवृत्त्यांचे अथर्वशीर्ष पठण झाल्यानंतर श्री गणेश व महालक्ष्मी आरती घेण्यात आली.
या प्रसंगी सोमाटणे गावातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात सखी महिला ग्रामसंघ सोमाटणे उपविभाग संवादिनी मावळ प्रतिभा डहाळे, अध्यक्ष ज्योती कदम, सचिव मीना जांभळीकर, लिपिक चेतना धनवडे, स्नेहल गराडे यांच्यासह अनुलोम पुणे जिल्हा उपविभाग प्रमुख जनसेवक राजकुमार जाधव, मावळ तालुका प्रमुख बाळासाहेब खांडभोर यांनी सरकारी योजना कशा मिळवाव्यात याबाबत मार्गदर्शन केले.
या सोहळ्यास पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मा.कार्याध्यक्ष संतोष मु-हे, तळेगाव विविध विकास सोसायटी संचालक प्रवीण मु-हे, महाराज विश्वंत जगताप, मा.सरपंच मंगला नवनाथ मु-हे, मा.सरपंच नलिनी गायकवाड, शालिनी मु-हे, वर्षा मु-हे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन बँकेचे अधिकारी अतुल काकडे व रोहन भेगडे यांनी केले होते. संस्थेचे आधारस्तंभ नगरसेवक संतोष भेगडे यांनी सर्वांना गणपती उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
—






