“सोमाटणे फाटा चौकातील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा – भाजपाचे निवेदन” “८ दिवसांत कार्यवाही न झाल्यास सर्वपक्षीय आंदोलनाचा इशारा”

SHARE NOW

सोमाटणे:

सोमाटणे फाटा चौक येथे होत असलेल्या तीव्र वाहतूक कोंडीच्या समस्येसंदर्भात आज तहसील कार्यालय, तळेगाव पोलीस स्टेशन व देहूरोड वाहतूक पोलीस चौकी येथे निवेदन देण्यात आले.

सुमारे ६५ गावांना जोडणारा हा चौक असल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्ग, शेतकरी, दुग्धव्यावसायिक यांची ये-जा होत असते. त्याचबरोबर पवना हॉस्पिटल, पायोनियर हॉस्पिटल, स्पर्श हॉस्पिटल अशा रुग्णालयांकडे जाणाऱ्या इर्मजन्सी रुग्णांनाही वेळेत उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

नोकरदार वर्ग वेळेवर नोकरीवर पोहोचत नाही, दुग्धव्यावसायिकांना दूध वेळेवर पोहोचविण्यात अडचण येते, तर शेतकऱ्यांचा शेतमालही बाजारपेठेत वेळेत पोहोचत नाही. याशिवाय उसें व बेबडओहोळ येथील औद्योगिक कंपन्यांनाही माल पोहोचविण्यात विलंब होतो.

Advertisement

या गंभीर वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून ट्रॅफिक कंट्रोलिंग ऑफिसरची नेमणूक करून चौकात सिग्नल बसविण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

निवेदन देताना भाजप महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष पै. बाळासाहेब घोटकुले, पवन मावळ मंडलाध्यक्ष श्री. दत्ताभाऊ माळी, मावळ तालुका उपाध्यक्ष श्री. राजेश मुर्हे, सांगवडे सरपंच श्री. रोहन जगताप, युवा नेते रामभाऊ गोपाळे, प्रदीप वाजे, नवनाथ गायकवाड, महेश भोईर, कल्पेश राक्षे आदी उपस्थित होते.

पुढील ८ दिवसांत कार्यवाही न झाल्यास भारतीय जनता पार्टीसह सर्वपक्षीय आंदोलन उभारले जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page