कृषीकन्या व गहुंजे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण करून शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कृषी दिन साजरा

SHARE NOW

सोमाटणे :

Advertisement

कृषीकन्या व गहुंजे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण करून शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कृषी दिन साजरा करण्यात आला. डॉक्टर डी वाय पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आकुर्डी येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी रिद्धी बोत्रे, माया धडस, आयुष देसाई मृदुला लांडगे स्वानंदिनी लोखंडे सानिका वाशिवले यांच्या वतीने कृषी कन्या उपक्रमांतर्गतच गहुंजे येथे प्रात्यक्षिकांसह शेतकरी प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमांतर्गत आठ दिवसात वृक्षारोपणाचे महत्त्व अधिक उत्पादन व रोगमुक्त पीक उत्पादन घेण्याचे तंत्र आधुनिक शेती पद्धतीचे फायदे, कमी क्षेत्रात अधिक उत्पादन वाढवण्याचे तंत्र नैसर्गिक कीटकनाशके व खताचा वापर पाणी व्यवस्थापन माती परीक्षणाचे महत्त्व आधी विषयाचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. कृषीदिनाचे औचित्य साधून या कृषी कन्यांच्या वतीने सरपंच कुलदीप बोडके, सदस्य हिरामण आगळे उद्योजक निखिल बोडके, विश्वास येवले यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात अधिक ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या झाडांची लागवड करून कृषी दिन साजरा करण्यात आला या उपक्रमात गहुंजे येथील शेतकरी, प्राथमिक शाळेतील विद्यार्थी,शिक्षक सहभागी झाले होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page