*सरस्वती विद्या मंदिरात रंगला बाल वारकऱ्यांचा ‘दिंडी सोहळा’*

SHARE NOW

इंदोरी :

सरस्वती विद्यामंदिर इंदोरी येथे आषाढी एकादशी निमित्त रविवार दिनांक ०६/०७/२०२५ रोजी भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा साजरा करण्यात आला.

ज्ञानोबा – तुकारामांचा जयघोष आणि टाळ – मृदंगाचा गजर करत सरस्वती विद्या मंदिर मधील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. श्री विठ्ठलांच्या भक्तीने विद्यालयाचा परिसर न्हाऊन निघाला होता. यावेळी सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सुरेश झेंड सर उपाध्यक्ष मा. श्री. दिलीप कुलकर्णी सर सदस्य मा. श्री. विश्वास देशपांडे सर मा. श्री. शेखर चौधरी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या मा. सौ. सुरेखाताई शेवकर मा. श्री. निलेश शेवकर तसेच स्त्री व पुरुष पालक पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन करून विठ्ठलाची आरती करण्यात आली.

Advertisement

या सोहळ्यात विद्यार्थी विठ्ठल- रुक्मिणी तुकाराम निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाईया संतांच्या वेशभूषेत तसेच सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या पोशाखात उपस्थित होते. पर्यावरणाचा संदेश देणारे बॅनर घेऊन सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये स्वच्छतेचे महत्व तसेच प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगणारे आणि पर्यावरणाचे महत्व सांगणाऱ्या घोषणा विद्यार्थी देत होते त्याचप्रमाणे ग्रंथ दिडी साक्षरता दिंडी काढण्यात आली. डोक्यावर तुळस कळशी घेऊन विद्यार्थीनी पारंपारिक वेशभूषेत उपस्थित होत्या. आमची ही बाल वारकरी दिंडी ग्राम प्रदक्षिणा घालून श्री विठ्ठल रुक्मिणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहोचली व त्या ठिकाणी बाल कीर्तनकार चि. अन्वेश हिंगे या विद्यार्थ्याने आई वडिलांची महती सांगणारे कीर्तन सादर केले. विद्यार्थ्यांनी लेझीम व बालवाडी व प्राथमिक विभागाचे गीतावर आधारित नृत्य सादर केले. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी भजन, गजर व भक्ती गीतांचे गायन केले. दिंडी सोहळ्यासाठी माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

तसे शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. नितीन शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बालवाडी विभाग प्रमुख मा. सौ. अर्चना एरंडे, मा सौ अनुराधा बेळणेकर व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा दिंडी सोहळा उत्साहात पार पडला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page