*सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडे मध्ये दिंडी सोहळा उत्साहात साजरा*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

सरस्वती शिक्षण संस्थेचे सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडे येथे रविवार दिनांक ०६/०७/२०२५रोजी दिंडी सोहळा उत्साहात साजरा झाला.

ज्ञानोबा माऊलींचा जयघोष आणि टाळ मृदुंगाचे निनाद करत सरस्वती विद्या मंदिरने दिंडी सोहळाचे आयोजन केले होते विठ्ठलाच्या भक्तीने आणि आषाढातील पावसांच्या सरींनी विद्यालयाचा संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला याप्रसंगी सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सुरेश झेंड व सौ.श्रध्दा झेंड, उपाध्यक्ष श्री दिलीप श्री दिलीप कुलकर्णी व सौ शिल्पा कुलकर्णी, खजिनदार सौ.सुचित्रा चौधरी व श्री शेखर चौधरी,सदस्य मा. श्री. विश्वास देशपांडे व सौ. शुभांगी देशपांडे , माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा परदेशी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री नवनाथ गाढवे सर आणि बालवाडी विभाग प्रमुख सौ. सोनाली काशीद बाई ,सर्व सहशिक्षक यांच्या हस्ते पालखी पूजन करून विठ्ठलाची आरती झाली.

Advertisement

तसेच या कार्यक्रमासाठी सरस्वती शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्री.प्रमोद देशक ,संस्थेच्या शिक्षण समिती सदस्या डॉ.सौ.ज्योतीताई चोळकर,सदस्य श्री.विश्वास देशपांडे ,सदस्य मा.श्री.सुनिल आगळे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या दिंडी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनाचे उत्तम सहकार्य लाभले.

या सोहळ्यात विद्यार्थी विठ्ठल रखुमाई , राधाकृष्ण तसेच वेगवेगळ्या संतांच्या वेशभूषेत उपस्थित होते .या सोहळ्यात पर्यावरणाचे संदेश देणारी बॅनर घेऊन विद्यार्थी सहभागी झाले यामध्ये स्वच्छतेचे महत्त्व सांगणाऱ्या ,पर्यावरणाच्या संरक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा विद्यार्थी देत होते. त्याचप्रमाणे ग्रंथदिंडी व साक्षरता दिंडी काढण्यात आली तसेच डोक्यावर तुळस, कळशी घेऊन विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते. तसेच प्राथमिक व माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी लेझीम,नृत्य, रिंगण, झांज यांचे सादरीकरण केले.या सोहळ्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.तसेच या दिंडी सोहळ्यासाठी माजी विद्यार्थी व पालक ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यानंतर पसायदानाने दिंडीची सांगता झाली व नंतर विद्यार्थ्यांना राजगिऱ्याचा लाडू खाऊ स्वरूपात वाटण्यात आले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page