*पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे

साक्षी डायग्नोस्टिसक्स हेल्थ केअर सोल्युशन येथे कै.शलाका संतोष खांडगे यांच्या स्मरणार्थ पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

तळेगाव दाभाडे,वडगाव,एमआयडीसी,शिरगाव,परंदवडी या पोलीस स्टेशनसह राज्य उत्पादन शुल्कसह विभागातील पोलीस कर्मचा-यांची आरोग्य तपासणी रोटरी क्लब अॉफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Advertisement

तपासणीत उंची,वजन,रक्तदाब,इसीजी आणि एक्सरे,मधुमेह आदीचा समावेश होता.अनेक महिला पोलीस कर्मचा-यांनीही तपासणीचा लाभ घेतला.यावेळी अध्यक्ष राहुल खळदे,सचिन कोळवणकर,सुनील खोल्लम,विन्सेंट सालेर,बाळासाहेब शिंदे,संदीप मगर,योगेश शिंदे आदी उपस्थित होते.तसेच सिध्दार्थ किल्लावाला,तळेगाव दाभाडे येथील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे,शिरगाव परंदवडी येथील पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे,राज्य उत्पादन शुल्क शाखेचे संजय सराफ,यांचेसह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन दशरथ जांभुळकर यांनी केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page