लोणावळा रेल्वे स्थानकात स्थानिक नागरिकांकडून रेल रोको आंदोलन करण्यात आले.

SHARE NOW

लोणावळा :

लोणावळा रेल्वे स्थानकात स्थानिक नागरिकांकडून हातात विविध मागण्यांचे होर्डिंग घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. यावेळी रेल्वे रुळावर उतरून स्थानिकांनी आंदोलन केले. रेल रोको केल्यामुळे एक्सप्रेसचे वेळापत्रक कोलमडले आहे.

तसेच यावेळी स्थानिक नागरिकांनी डेक्कन क्वीनला रोखले, डेक्कन क्वीन च्या इंजिन वर चढून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली. लोणावळ्यातील नागरिकांचे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत त्यांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात तसेच बंद केलेल्या लोकल पुन्हा सुरू करण्याची मागणी देखील केली आहे.

Advertisement

पुणे मुंबई डेक्कन क्वीन ही सुमारे वीस मिनिटं लोणावळा रेल्वे स्थानकात रोखली गेली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करून पुणे मुंबई डेक्कन क्वीन मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली.

लोणावळा रेल्वे स्थानकात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वेगवेगळ्या मागण्या स्थानिक जनता गेल्या काही दिवसांपासून करत होती मात्र त्यांच्याकडे लक्ष न दिल्याने त्यांनी आंदोलन करण्याचा पवित्र घेतला आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page