मा.नगरसेवक श्री.सुभाष साळुंके व सौ.सुवर्णा साळुंके यांच्या संवाद दिनदर्शिकेचे कल्याण लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
*अंबरनाथ* : मा.नगरसेवक श्री.सुभाष साळुंके व सौ.सुवर्णा साळुंके यांच्या संवाद दिनदर्शिकेचे कल्याण लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.यावेळी वर्षभरात केलेल्या विकासकामाचा लेखाजोखा तसेच राबविलेल्या विविध कार्यक्रम – उपक्रमाचा आढावा व उपयुक्त माहिती देणारी “संवाद दिनदर्शिका–२०२४” दरवर्षी नागरिकांपर्यंत उत्तमरित्या पोहचविण्याचे काम श्री. सुभाष साळुंके हे न चुकता करतात, असे गौवरोद्गार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांनी काढले.

संवाद दिनदर्शिका ची उत्कृष्ट मांडणी, कालनिर्णय प्रमाणे सविस्तर माहिती जनसामान्यपर्यंत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पोहचविण्याचे दरवर्षी प्रमाणे श्री साळुंके दांपत्य करीत असतात, याचा आम्हाला अभिमान वाटतो ,असे किर्तनकार ह.भ.प विश्वनाथ वारिंगेमहाराज यांनी सांगितले.
यावेळी ह.भ.प योगीमहाराज गोसावी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, युवासेना विस्तारक श्री. दिपेश जी म्हात्रे,डोंबिवली शहर प्रमुख श्री.राजेश मोरे, माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख, कल्याण शहर प्रमूख श्री. रवि पाटील,महेश गायकवाड, उपस्थीत होते.
तसेच महाड पोलादपूर मतदासंघाचे शिवसेना आमदार मा. भरतशेठ गोगावले यांनी संवाद दिनदर्शिका-२४ चे कौतुक केले. याप्रसंगी संपर्क प्रमुख श्री.सुभाष पवार,अनंत यादव उपस्थित होते.
संवाद दिनदर्शिका ची प्रभागातील नागरिक चातका प्रमाणे वाट पाहत असतात, प्रत्येकाला हवी हवी वाटणारी उपयुक्त अशी संवाद दिनदर्शिका गेले ११ वर्षा पासून नियमितपणे नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आनंद वाटतो. अश्या भावना श्री. सुभाष साळुंके यांनी व्यक्त केल्या.






