*अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचा सन्मान सोहळा दिमाखात संपन्न* *आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव*
अंबरनाथ :आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्तसमाजसेवकांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेला सन्मान सोहळा अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अजयराव चिरिवेल्ला यांनी यशस्वी करून दाखवला.

दीप प्रज्वलन नंतर अंध बांधवांच्या सुरेख गणेश वंदनाने सोहळ्याला सुरुवात झाली. यानंतर अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली.
यावेळी प्रमुख पाहुणे अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एम.यू. दुवा तसेच उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी व आदी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देण्यात आले. यात उद्योजक प्रमोदकुमार चौबे, प्रशासक अमोल मानकर, समाजसेवक राहुल व विकास सोमेश्वर, निखिल वाळेकर, लीना सावंत, निखिल चौधरी, ऑलम्पिक खेळाडू वसीम मुल्ला, पत्रकार तन्वीर शेख आदींचा समावेश होता. यावेळी माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, भाजपच्या सुजाता भोईर, काँग्रेसचे विजयन नायर, रोटरीयन सर्जेराव सावंत, मयूर विसारिया, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खानजी धल, डॉ. प्रथमेश जयवंत, श्रीनिवास वाल्मिकी आदींसह शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या महिला अध्यक्षा दिपा अडविन, नीरजा आनंदकुमार, दर्शना चिरीवेल्ला, पौर्णिमा जाधव, व्यंकटेश राव के, प्रदीप कुमावत, मनिष ठाकूर, प्रफुल थोरात, सुनील अहिरे, राजेंद्र सूर्यवंशी, उस्मान शाह, मुन्नालाल उपाध्याय आदींनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यात अंबरनाथमधील पत्रकारांचे विशेष योगदान लाभले.






