श्री.देविदास हगवणे यांचा गरजु विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात…
देहू :
संत तुकाराम विद्यालय, देहू व संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहू येथील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना देहूगावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री.देविदास जयदेव हगवणे यांच्या वतीने वै. श्रीमती आनंदीबाई भागुजी हगवणे यांच्या स्मरणार्थ तसेच वै. किसनराव (बापू) मारुती जोरी, माजी सरपंच व माजी सभापती, हवेली पंचायत समिती यांच्या स्मरणार्थ तसेच प्रसिद्ध अभिनेते पद्मभूषण स्व.धर्मेंद्र देवल यांच्या स्मरणार्थ पाच विद्यार्थी व पाच विद्यार्थिनींना अशा एकुण दहा विद्यार्थ्यांना सन २०२६-२७ या पूर्ण शैक्षणिक वर्षातील फी देण्यात आली.
श्री.देविदास हगवणे यांच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गेल्या पाच वर्षापासुन सातत्याने ही आर्थिक स्वरूपातील मदत केली जाते. याशिवाय कायमच शाळेच्या विकासासाठी त्यांचा अनमोल सहभाग असतो. याप्रसंगी त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विद्या कांबळे मॅडम, मुख्याध्यापिका श्रीमती निवेदिता पासलकर मॅडम यांनी श्री.द






