इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती गुरव फडावर कीर्तन सेवा हरिनाम गजरात ; भाविकांची माऊली मंदिरात दर्शनास गर्दी
आळंदी (प्रतिनिधी ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांचे वतीने मंदिरातील एकादशीचे दिनी परंपरे प्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. मंदिरात श्रींचे दर्शनास भाविकांची गर्दी झाली होती. मात्र मंदिरातील दर्शन बारी नियोजन व्यवस्थित नसल्याने मंदिर परिसरात भाविकांना गैरसोयीस सामोरे जावे लागले. नाहक चेंगरा चेंगरी आणि काही भाविकांनी मंदिरात प्रवेश करण्यासाठी संताप व्यक्त केला. दर्शनाबारीचे नियोजन फसले. मंदिरातील अनेक दरवाजे बंद केल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त करीत स्थानिक नागरिकांना कळविले. यावर संबंधित ठिकाणी पोलिस प्रशासनाचे, महसूल प्रशासनाचे सांगण्यावरून पुन्हा दरवाजे खुले करण्यात आले. आळंदी तील इंद्रायणी नदी घाटावर परंपरेने कीर्तन सेवा हरिनाम गजरात झाली. इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने इंद्रायणी आरती उत्साहात झाली. यावेळी संयोजिका अनिता झुजम, अनिता शिंदे, सुवर्णा काळे, गोविंद ठाकूर, संयोजक अर्जुन मेदनकर आदी उपस्थित होते. समस्त ग्रामस्थ आळंदीकर यांचे वतीने कीर्तन परंपरेचा असलेला एकमेव फड म्हणजे वैकुंठवासी गुरुवर्य मारुती बुवा गुरव आळंदीकर हा किर्तन परंपरेचा फड आहे. या फडावर गेल्या शंभर वर्षा पासून दर वदय एकादशीला कीर्तन सेवा होत. या फडावर अनेक मोठ मोठे कीर्तनकार यांची कीर्तन सेवा रुजू झाली आहे. यात हभप रंगनाथ महाराज परभणीकर, हभप धुंडा महाराज देगलुरकर, हभप किसन महाराज साखरे, हभप वक्ते महाराज बाबा आदी नामवंत कीर्तनकार यांच्या नावांचा समावेश होता. फडावरील ही परंपरा आजता गायत आळंदीत निरंतर चालू आहे. कमला एकादशी दिनी देखील सेवा रुजू झाल्याचे वंशज संकेत वाघमारे यांनी सांगितले. कमला एकादशी दिनी इंद्रायणी सेवा समिती आळंदी यांचे इंद्रायणी आरती पूर्वी देवतळे ऋषीकेश किर्तनकार यांची कीर्तन सेवा रुजू झालीं. यावेळी वादक कृष्णा महाराज घंगाळे, गायक करण महाराज पाटील पंढरपुरकर यांनी साथ दिली. इंद्रायणी नदी घाटावर आळंदी देवस्थान तर्फे आयोजित इंद्रायणी आरती इव्हेंट उत्साहात झाला. या वेळी पिंपरी चिंचवड महापौर रवी लांडगे, देवस्थानचे विश्वस्त ॲड राजेंद्र उमाप, रोहिणी पवार, निलेश महाराज लोंढे, योगी निरंजन नाथ, पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक माऊली वीर आदी मान्यवर उपस्थित होते. आळंदी देवस्थानला खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी रुग्णवाहिका भेट दिली. यावेळी डॉ. राम गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.





