विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद

SHARE NOW

*विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद*

 

*२५ व २६ नोव्हेंबर या सुट्टीच्या दिवशी ११ हजार ४९६ अर्ज प्राप्त*

 

पुणे, दि. २८: विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात २५ व २६ नोव्हेंबर या सुट्टीच्या दिवशी आयोजित शिबीरामध्ये मतदार नोंदणी, नावांची वगळणी, तपशीलात दुरुस्ती, आधार क्रमांक जोडणी यासाठीचे एकूण ११ हजार ४९६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी मतदार नोंदणीचे ६ हजार ५०४ इतके अर्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात सुरु आहे. याअंतर्गत दोन दिवसांच्या विशेष शिबीरामंध्ये नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना क्र. ६ चे ६ हजार ५०४, नावे कमी करण्याकरीता नमुना क्र. ७ चे २ हजार ५६, तपशीलमध्ये दुरुस्तीसाठी नमुना क्र. ८ चे २ हजार ४५८, आणि आधारकार्ड जोडणीकरीता नमुना क्र. ६ ब ४७८ असे अर्ज प्राप्त झाले आहेत.

Advertisement

 

या शिबीरांमध्ये नवीन मतदार नोंदणीचे जुन्नर विधानसभा मतदारसंघात ३३१, आंबेगाव २२७, खेड आंळदी ५२२, शिरुर २८७, दौंड ६८६, इंदापूर २०१, बारामती ६५८, पुरंदर २४६, भोर २३४, वेल्हा ११२, मुळशी १३९, मावळ ६७२, चिंचवड २६६, पिंपरी २०३, भोसरी १८८, वडगाव शेरी २४८, शिवाजीनगर १२९, कोथरुड १२८, खडकवासला १२२, पर्वती १६१, हडपसर २७२, पुणे कटकमंडळ २६६ आणि कसबा पेठ २०६ असे एकूण ६ हजार ५०४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

 

डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ९ डिसेंबरपर्यत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक नवमतदारांनी आपले मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे. ज्या मतदारांनी नाव नोंदविले आहे त्यांनी मतदार यादीत आपले नाव, छायाचित्रे, पत्ता आदी तपशील पडताळून पहावे, त्यामध्ये काही बदल असल्यास बदल करावे. याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या https://eci.gov.in/ या संकेतस्थळाला किंवा ‘वोटर हेल्पलाईन’ ॲपचा वापर करावा.

0000


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page