*इंदोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच सरस्वती विद्या मंदिर येथे लायन्स क्लब ऑफ वडगांव यांच्या वतीने सीसीटीव्ही, स्मार्ट टीव्ही,तसेच कॉम्प्युटर संच भेट*
इंदोरी :

इंदोरी गावच्या माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्या लतिका निलेश शेवकर तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश मच्छिंद्र शेवकर यांच्या प्रयत्नातून इंदोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानसरे वस्ती आणि सरस्वती शाळा याठिकाणी लायन्स क्लब ऑफ वडगाव यांच्या वतीने सीसीटीव्ही स्मार्ट टीव्ही तसेच कॉम्प्युटर संच देऊन मुलांना खाऊ वाटप करण्यात आले..
या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ वडगावचे संचालक आणि मावळ पंचायत समितीचे मा.सभापती श्री गुलाब काका म्हाळसकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.तसेच लायन्स क्लब ऑफ वडगावचे सुनीत कदम,बाळासाहेब बोरावके,नंदकिशोर गाडे मा नगरसेवक भूषण मुथा प्रमुख पाहुणे म्हणून आदी उपस्थित होते.
इंदुरीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच शशिकांत शिंदे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की नुसते पदासाठी काम न करता समाजाचे सुद्धा काहीतरी देणे लागते हे लतिका शेवकर यांनी समाजाला दाखवून दिले..
हुलगे भाऊसाहेब यांनी माझी वसुंधरा अभियान तसेच नुकत्या पार पडलेल्या घरकुल वाटप ,तसेच झाडे लावा झाडे जगवा चा संदेश दिला..
नगरसेवक भूषण मुथा यांनी लायन्स क्लब ऑफ वडगाव हे नेहमीच समाज उपयोगी तसेच शाळांना भौतिक सुविधा मिळून देण्यासाठी कार्यरत असते..
प्रभारी सरपंच संदीप ढोरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे गोरगरीब शिकणाऱ्या मुलांसाठी असे उपक्रम राबविण्यात येण्याचे आवाहन केले..
अध्यक्ष गुलाब काका म्हाळसकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असे उपक्रम होणे हे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी नक्कीच उज्वल आहे असे मत व्यक्त केले.
सूत्रसंचलन विशाल पवार यांनी केले . तसेच कार्यक्रमास सर्व मान्यवर उपस्थित राहिल्याबद्दल उपस्थितांचे आभार लतिका निलेश शेवकर यांनी केले.
कार्यक्रमास उपस्थित उपसरपंच बेबीताई बैकर,माजी उपसरपंच बाळकृष्ण पानसरे, धनश्री काशीद, दिनेश चव्हाण, विक्रम पवार आशिष ढोरे, प्रभारी सरपंच संदीप ढोरे इंदुरी ग्रामपंचायतचे हुलगे भाऊसाहेब
विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मधुकर शिंदे ,राजश्री राऊत ,दत्तात्रय ढोरे, सामाजिक कार्यकर्ते निलेश मच्छिंद्र शेवकर, संदीप नाणेकर संजय पवार,निलेश पानसरे ,गणेश शिंदे,काळुराम पवार कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते..






