“जिल्हा परिषद शाळा ठाकरवाडी व नाणे मावळ येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा”
मावळ:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी, ता. मावळ येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणे मावळ येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्सचे अध्यक्ष रो. वासुदेव लखिमले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अध्यक्षा रो. ज्योती राजीवडे, उपाध्यक्ष रो. सुनील जाधव, रो. गणेश शेडगे, रो. प्रथमेश बनसोडे, मा. भरत नाना राजिवडे, रो. संतोष नाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेचे प्राध्यापक श्री. उत्तम देसाई, पुष्पा इंगळे, सुरैया शेख, छायाताई साळुंखे, अंगणवाडी सेविका तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी शाळेच्या अडचणी मांडल्या असता रोटरी क्लब अध्यक्ष व संस्थापक अध्यक्षा यांनी शाळेसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
शेवटी विद्यार्थ्यांना वही, पेन व खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.






