तनिष्का पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अर्चना घारे उपाध्यक्षपदी ज्योती बधाले, सचिवपदी शबनम खान, खजिनदारपदी सारिका विनोदे

SHARE NOW

वडगाव मावळ दि.९

मावळ तालुक्यात महिला संचलित असलेल्या तनिष्का नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून अध्यक्षपदी संस्थापक अर्चना घारे व उपाध्यक्षपदी ज्योती बधाले यांची फेरनिवड करण्यात आली तर सचिवपदी शबनम खान व खजिनदारपदी सारिका विनोदे यांची निवड करण्यात आली.

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, वडगाव मावळ यांच्याच्या मान्यतेने तसेच निवडणूक निर्णय अधिकारी एम. ए. जरे यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. यावेळी सर्वानुमते नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाची निवड जाहीर करून नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

संस्थापक अध्यक्षा अर्चना घारे म्हणाल्या, ही महिला संचलित असलेली तालुक्यातील एकमेव सर्वसाधारण पतसंस्था असून संपूर्ण संचालक मंडळ महिला व कर्मचारीही महिला आहेत. पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने कामकाज सुरू असल्याने संस्थेच्या कामकाजाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. संस्थेमार्फत लवकरच सोनेतारण कर्ज योजना सुरू करण्यात येणार असून, सभासदांना अल्पदराने सोप्या अटींवर त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्याचा मानस घारे यांनी व्यक्त केला.

Advertisement

संस्थेचे ३,५५७ सभासद असून ६ कोटी १९ लाख २३ हजार २३१ रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच ७ कोटी ९८ लक्ष ८२ हजार १८२ रुपयांच्या ठेवी, सुमारे १० कोटींची वार्षिक उलाढाल असून यावर्षी ९ लाख ८० हजार ९६० नफा झाला आहे. लवकरच वार्षिक अहवाल सादरीकरण व लाभांश वितरणाचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचेही घारे यांनी सांगितले.

 

नूतन पदाधिकारी व संचालक मंडळ पुढीलप्रमाणे :

अध्यक्ष – अर्चना संदीप घारे, उपाध्यक्ष – ज्योती विठ्ठल बधाले, सचिव – शबनम आमिन खान, खजिनदार – सारिका गणेश विनोदे, संचालक – शुभांगी साहेबराव कारके, कमल रोहिदास गराडे, वैशाली पंढरीनाथ ढोरे, मनिषा जयराम आंबेकर, सुमित्रा पवन दौंडकर, सुवर्णा वसंत गाडे, मनिषा अनिल वाघोले, ललिता सत्यवान कोतूळकर, स्वाती दौलतराव भेगडे, कल्पना कैलास काजळे, सीमा कमलाकर बालगुडे, पुष्पा रमेश घोजगे, सुवर्णा राजेश राऊत, सुप्रिया श्रीकांत बडवे, व्यवस्थापक – मोनाली चंद्रकांत केंजळे

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page