अॅड.पु.वा.परांजपे विद्या मंदिरात हरिनामाच्या गजरात दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.*
आज अॅड पु.वा.परांजपे विद्या मंदिरात कार्तिकी एकादशी अर्थात ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी यात्रॆच्या निमित्ताने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव चे अध्यक्ष *श्री.उद्धव चितळे*,रोटरी क्लब ऑफ तळेगाव चे सेक्रेटरी *श्रीशैल म्हेंथे* तसेच रोटरी क्लब ऑफ तळेगाव चे माजी अध्यक्ष *श्री.आनंद असवले* आदि मान्यवर उपस्थित होते.
रोटरीयन उद्धव चितळे,श्रीशैल म्हेंथे,श्री.आनंद असवले,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पांडुरंग पोटे सर,दिंडी प्रमुख विकास दगडे सर ज्येष्ठ अध्यापक श्री.शरद जांभळे सर,संजय खराडे सर यांनी दिपप्रज्वलन,सरस्वती पुजन व पालखीचे पुजन केले.यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यालयाच्या विविध बालचमुंनी विठ्ठल रुक्मिणी,निवृत्तीनाथ,ज्ञानेश्वर महाराज,सोपानदेव,मुक्ताई,तुकाराम महाराज यांची पात्रे साकारली.आजच्या दिंडी सोहळ्याचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पांडुरंग पोटे सर यांनी केले.रोटरीयन उद्धव चितळे यांनी आपल्या मनोगतातुन वारकरी पोशाखात आलेल्या बालचमुंचे स्वागत केले व सर्व विद्यार्थ्यांना आपला सांस्कृतीक वारसा जपण्याचा संदेश दिला.
दिंडी सोहळ्याचे प्रस्थान अॅड.पु.वा.परांजपे विद्या मंदिर ते तळेगावातील विठ्ठल मंदिर असे झाले.या दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी सुंदर अभंग सादर केले.लेझीम पथकानेआपले लक्षवेधी डाव सादर करून ग्रामस्थांची मने जिंकली. हरिनामाच्या गजरात फुगड्या घालत अतिशय उत्साही वातावरणात दिंडी सोहळ्याचे प्रस्थान विठ्ठल मंदिरात झाले.*विठ्ठल मंदिराचे ट्रस्टी व कीर्तनकार ह.भ.प.श्री.माऊली दाभाडे यांनी आलेल्या सर्व बालचमुंचे स्वागत करुन आपली प्रवचनरुपी सेवेतून मुलांना आपली संस्कृती चे महत्व सांगितले. *
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन *सौ.नयना पारीठे* यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक *श्री.पांडुरंग पोटे सर* यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतीक विभाग,सर्व शिक्षक,शिक्षकेतर वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.