तळेगाव दाभाडे नगरपरिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक.2 मध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

Oplus_16908288

तळेगाव दाभाडे नगरपरिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक 2 तळेगाव दाभाडे मध्ये दिनांक 14 फेब्रुवारी रोजी इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अतिशय उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका, मासाहेब उमा राजे दाभाडे सरकार तसेच वहिनीसाहेब योग्यसेनी राजे दाभाडे सरकार, रोटरियन विलास शहा, ज्येष्ठ पत्रकार अमीन खान सर, नगरसेविका शोभा परदेशी मॅडम,शबनम खान(अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस),दामिनी पथक प्रमुख सुनंदा जाधव व स्वाती टेमकर तसेच सतर्क महाराष्ट्र संपादिका रेखा भेगडे आणि सन्माननीय शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमात मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि आत्मविश्वासाने संकटांचा सामना करण्याचे आवाहन केले.

Advertisement

विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला, तर शिक्षकांनी आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप दिला. या प्रसंगी विविध गाणी आणि नृत्यांचा कार्यक्रम देखील सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि स्नेहमिलन पार पडले.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:

शाळेचे सुशोभीकरण.

शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन.

विद्यार्थ्यांचे मनोगत.

स्नेहभोजन.

कार्यक्रमाची प्रस्तावना- मुख्याध्यापिका वर्षा थोरात मॅडम यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ नीलम जाधव मॅडम व सौ मीना सावंत मॅडम तसेच निकिता कालेकर मॅडम यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन योगिता तावरे मॅडम यांनी केले . हा सोहळा सर्वांच्या स्मरणात राहील अशाप्रकारे पार पडला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page