*संविधान सुरक्षित तर देश सुरक्षित -जिले सिंह*

तळेगाव दाभाडे येथे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी आणि समग्र डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या वतीने संविधान संवर्धनासाठी विशेष कार्य करणाऱ्या देशभरातील व्यक्तींचा संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ जणांचा संविधान संवर्धन व रक्षक पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान तळेगाव दाभाडे येथे देऊन सन्मानित करण्यात आले.

भारतीय संविधान ही लोकशाहीची मुळाक्षरे आहे. संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून आपल्या सर्वांच्या समानतेचा स्वातंत्र्याचा बंधुतेचा आणि न्यायाचा मूलमंत्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाशिवाय संविधान तयार होणे अशक्य होते ही संविधान संपूर्ण जगासाठी प्रेरणादायक आहे.

Advertisement

असे प्रतिपादन मिलिंद शेलार यांनी केले. यावेळी येथील संविधान प्रदर्शनाचे उदघाटन असिस्टंट कमांडेड शौर्य चक्र पुरस्कार विजेते भारत सरकार जिले सिंह यांच्या हस्ते करण्यात आले आपल्या मनोगतातून संविधान सुरक्षित तर देश सुरक्षित असे व्यक्त करून पुलवामा मध्ये घडलेल्या प्रसंगाचे वर्णन केले देशाचे सीमेवर आणि देशाची अंतर्गत सुरक्षा करणारे सर्व सुरक्षा बले जशी आपल्याला सुरक्षा प्रदान करतात त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्रीय ग्रंथ संविधान आपली नेहमीच सुरक्षा करतो असे यावेळी ते म्हणाले महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आयपीएस डी कनकरत्नम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानास ‘सविधान भूमी’ या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले आले. संविधान न्याय समता समानता याची ग्वाही प्रत्येकाला देते असे मत यशवंत मानखेडकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून व्यक्त केले.

यावेळी जीएसटी आयुक्त आयआरएस डॉ. प्रशांत रोकडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्षा अॕड.रंजना भोसले,सचिव किसन थुल, प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे, सुनील रहाटे, हिरामण बोत्रे, संदीप मगर, राजेंद्र पंडित, सुवर्णा मते, उमा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.रोटरी क्लब अॉफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली.

सुमती निलवे यांनी संविधान उद्देशिकाचे वाचन केले. शोभा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन, तर सुनील रहाटे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page