संतोष भेगडे बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल तळेगाव दाभाडे पोलिसांची कारवाई
तळेगाव दाभाडे:पुणे महानगर नियोजन समितीचे माजी सदस्य आणि तळेगाव दाभाडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष छबूराव भेगडे (४२) यांची समाजमाध्यमावर बदनामी केली. २७ ऑगस्ट रोजी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात सहा जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण मालपोटे, अतुल मराठे, किशोर सावंत, अक्षय धामणकर, भरत येवले, प्रशांत अशोकराव जांभळे यांच्याविरोधात तळेगाव पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. संतोष भेगडे यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, तसेच पुणे महानगर नियोजन समितीचे माजी सदस्य असलेले संतोष भेगडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष आहेत.तसेच बांधकाम व्यावसायिक असून, ते बांधकाम साहित्य पुरवठादार आहेत. त्यांचा फोटो वापरून ‘होय मी मलिदा गँगचा सभासद’ असा मजकूर समाजमाध्यमांवर टाकून त्यांची बदनामी केल्याचे दिसून आले. त्यावरून अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे.