रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स पुरस्कृत आर.सी.सी. तळेगाव दाभाडे चॅलेंजर व Equitas Devlopment Initiatiatives Trust व H.V. देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
तळेगाव दाभाडे :
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स पुरस्कृत आर.सी.सी. तळेगाव दाभाडे चॅलेंजर व Equitas Devlopment Initiatiatives Trust व H.V. देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथील जोशी वाडा मध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात लोकमाता पुण्यश्लोक देवी श्री अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. त्यामध्ये मोफत डोळ्यांची तपासणी व अल्प दरात चष्मे देण्यात आले. शिबिरामध्ये जवळपास 80 लोकांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये 25 लोकांना अल्प दरात चष्मा देण्यात आले तसे 12 लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन फ्री मध्ये करून देण्यात येणार आहे असे आश्वासन रोटरी क्लब चॅलेंजर्स च्या अध्यक्षा रो. ज्योती राजीवडे यांनी दिले. मा .श्री.अजिंक्य शिंदे यांनी ट्रस्ट सी.एस.आर. फंडातून कशा संदर्भात काम करते त्याची थोडक्यात माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक रो. ज्योती राजीवडे यांनी केले. आर.सी.सी. चॅलेंजर च्या अध्यक्षा रो.नीलम रोहिटे यांनी सर्व तपासणी करिता आलेले सर्व ग्रामस्थांचे,आर.सी.सी. चॅलेंजर मेंबरचे व डॉक्टरांचे तसे जागा उपलब्ध करून दिली त्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा माननीय सुलोचनाताई आवारे यांचे आभार मानले . प्रकल्प प्रमुख म्हणून रो.वैशाली लगाडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे आभार रो. वैशाली लगाडे यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर किशोर खडसे रो.भरत नाना राजीवडे तसेच आर.सी.सी. चॅलेंजर्स च्या उपाध्यक्षा सचिव व सर्व आरसीसी मेंबर उपस्थित होते. तसेच जोशी वाडी मधील व आजूबाजूच्या सोसायटीतील ग्रामस्थ उपस्थित होते.