रोटरी सिटीचे वंचितांसाठी कार्य प्रांतपाल शितल शहा.
तळेगाव दाभाडे :
रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी चे कार्य डिस्ट्रिक्ट मध्ये कौतुकास्पद असून त्यांनी अतिशय स्तुत्य असे उपक्रम या वर्षात घेतले आहेत.
तसेच किरण ओसवाल यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
डिस्टिक 3131 चे प्रांतपाल शितल शहा यांनी तळेगाव रोटरी सिटीला भेटी प्रसंगी दिले.
किरण ओसवाल यांच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी अनेक बक्षिसे डिस्टिक मध्ये मिळवली त्यात मेंबरशिप मध्ये 6 व फाउंडेशन मध्ये 4 पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष अभिनंदन केले व येणाऱ्या काळामध्ये ते अधिक जोमाने कार्य करतील अशी अपेक्षा प्रांतपाल यांनी व्यक्त केली.
यावेळी 26/27 चे प्रांतपाल नितीन ढमाले,किरण इंगळे,दिलीप पारेख,सुरेश धोत्रे,RCC अध्यक्ष अनिता भेगडे,रोट्रॅक्ट अध्यक्ष रोशनी ओसवाल,राजन आंबरे,सुरेश शेंडे,शरयू देवळे,कमल ढमढेरे,वर्षा खारगे,संजय वाघमारे शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट मध्ये पहिल्यांदाच तळेगाव शहरातून डायरेक्टर म्हणून निवड झालेले. सह प्रांतपाल दीपक फल्ले व ऋषिकेश कुलकर्णी यांचा सन्मान यावेळी शितल शहा यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
तसेच सह प्रांतपाल म्हणून भालचंद्र लेले व विन्सेंट सालेर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला तर दुग्धभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल रोटरी सिटी चे माजी अध्यक्ष मनोज ढमाले यांचा प्रांतपाल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
रोटरी सिटीचे अध्यक्ष किरण ओसवाल यांच्या अध्यक्ष काळातील कार्याचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. तसेच गम मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रदीप टेकवडे व बसप्पा भंडारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
तळेगाव शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील क्लबचे अध्यक्षांना एकत्रित बोलावण्यामागील उद्देश रोटरी सिटी हा एक परिवार आहे आणि या परिवाराबरोबर एकत्रित राहून समाजाचे कार्य पुढे नेण्याचा मनोदय यावेळी रोटरी सिटी चे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी व्यक्त केला.
यावेळी ALF तुषार लोहरकर, सहप्रांतपाल अजित वाळुंज यांची सुद्धा मनोगत झाली.
डिस्टिक मधील इतर क्लबचे अध्यक्ष महेश रजपूत,संतोष गिरंजे, प्रशांत शेजवळ,महादेव शेंडकर,कमलेश कारले,ज्योती राजवडे,नितीन घोटकुले,मिलिंद शेलार, राजन जांभळे,रेश्मा फडतरे,सारंग माताडे, योगेश शिंदे हे उपस्थित होते तर रोटरी सिटीचे सदस्य,आशाताई व रोट्रॅकट सदस्य मोठ्या संख्येने परिवारासह उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन दीपक फल्ले,संतोष परदेशी,प्रशांत ताये,बसप्पा भंडारी,प्रदीप टेकवडे,राकेश ओसवाल,प्रदीप मुंगसे, राकेश गरुड,मनोज नायडू,रोहित अग्रवाल, सौरभ मेहता, रितेश फाकटकर, विकी बेल्हेकर,दशरथ ढमढेरे,गणपत जाधव यांनी केले.
सर्व पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष किरण ओसवाल व फर्स्ट लेडी अनिता ओसवाल यांनी केले.
सूत्रसंचालन दीपक फल्ले यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश दाभाडे यांनी केले.