तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन च्या वतीने दहावी – बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व पालकांचा सन्मान

SHARE NOW

तळेगाव दाभाडे दि. 31 (प्रतिनिधी) तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन च्या वतीने तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या सभासदांच्या पाल्यांचा जे दहावी बारावी उत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा दि. 30 मे 2026 रोजी मयुरेश डायनिंग हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शार्दुला सुरेश शिंदे हिचा सन्मान करण्यात आला, तिने आदर्श विद्या मंदिर तळेगाव दाभाडे या शाळेतून इयत्ता दहावी मध्ये 79.40% एवढे गुण मिळून यश संपादन केले. यावेळी शार्दुला चे आई-वडील सुरेश शिंदे व शुभांगी शिंदे तसेच भाऊ सृजन शिंदे, मावशी दिपाली सिंग हे सत्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित होते.

Advertisement

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे सचिव डॉ. संदीप गाडेकर यांनी केले, प्रास्ताविक कार्याध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी केले, या सत्कार सोहळ्यात प्रकल्प प्रमुख अमीन खान यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सत्काराला उत्तर देताना शार्दुला शिंदे हिने प्रेस फाउंडेशनचे आभार मानले तसेच वडील सुरेश शिंदे यांनी देखील प्रेस फाउंडेशनचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष विलास भेगडे होते.

यावेळी तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे उपाध्यक्ष रमेश जाधव गुरुजी, पत्रकार परिषद प्रमुख रेखा भेगडे, खजिनदार अंकुश दाभाडे, महेश भागीवंत, अमित भागीवंत, संतोष थिटे, मयूर सातपुते आदी सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केदार शिरसट यांनी केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page