मावळच्या कन्याची परदेशात गगन भरारी

SHARE NOW

मावळच्या कन्याची परदेशात गगन भरार
आर्या जितेंद्र बोत्रे मावळ तालुक्यातील वेहेरगाव या छोट्याशा गावामध्ये राहणार्या मुलीची प्रदेशात उत्तुंग भरारी घेतली आहे ,युके इंग्लंड मध्ये मँचेस्टर या नामांकित युनिव्हर्सिटी मधून मास्टर्स ॲाफ सायन्स बायोटेक्नॉलॉजी ॲन्ड इंटरपायजेस या डिग्रीचे शिक्षण मेरिट लिस्ट मध्ये येऊन पूर्ण केले आज तिचा पदवीधर समारंभ इंग्लंड येथील मँचेस्टर युनिव्हर्सिटी मध्ये अत्यंत थाटामाटा मध्ये संपन्न झाला तिने शालेय शिक्षण लोणावळा येथील रायगड इंटरनॅशनल या शाळेमधून पूर्ण केले शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व इतर कार्यक्रमांमध्ये ती सहभागी होत असत शाळेच्या जडणघडणीमध्ये ती अग्रभागी असत शाळेमध्ये ती विद्यार्थ्यांमधून मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून शालेय कॅप्टन म्हणून तिची निवड करण्यात आली होती , विद्यार्थ्यांकरिता तिने खूप चांगलं कार्य केले ,शालेय गॅदरिंग मध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावरती एक नाट्य प्रयोग करण्यात आला होता त्यावेळी तिने जिजाऊची भूमिका खूप सुंदर पद्धतीने साकार केल्याचे लोणावळ्याकरांनी बघितले आहे पुढील शिक्षण तिन्ही त्यानंतर पुणे येथील वाडिया कॉलेजमध्ये अत्यंत चांगल्या गुणांनी पूर्ण केल्यानंतर युके येथील अनेक युनिव्हर्सिटी च्या मध्ये तिने प्रवेशासाठी एप्लीकेशन केले होते अभिमानाची गोष्ट म्हणजे तिने सात कॉलेजची निवड केली होती सातही कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला होता नामांकित मँचेस्टर युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेण्याचं तिन्ही निर्णय केला अभ्यासामध्ये तिने स्वतःला झोकुन घेऊन खूप मेहनत करून तिने ही डिग्री मेरीट लिस्ट मधुन संपादन केल्याचे आई-वडिल नातेवाईक व आपल्या मावळ तालुक्यातील सर्व लोकांन मध्ये अभिमान व आनंद निर्माण झाला आहे मेरिट लिस्ट मध्ये आल्याने इंग्लंड मध्ये अनेक नोकरीच्या संधी आल्या आहेत


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page