श्री क्षेत्र देहूत श्री हनुमान जन्म उत्सव सोहळा उत्साहात देहू चा राजा हनुमान मित्र मंडळ वतीने विविध कार्यक्रम आयोजित

SHARE NOW

देहूगांव प्रतिनिधी

हनुमान जयंती म्हणजे हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस होय चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते याच प्रमाणे

दि २रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला असून श्रीच्या अभिषेक व महापूजा पहाटे ४ ते ५ श्री चा जन्मोत्सव कीर्तन पहाटे ५ ते ७श्री चा जन्म काळ सकाळी ६ वाजून ३९ मिनिटांनी साजरा करण्यात आला यावेळी भावी भक्ताने फुलांचा वर्षाव करण्यात आला श्री क्षेत्र देहू ग्रामस्थ पंचक्रोशीतील सांप्रदायिक भजनी मंडळ सेवा सकाळी ९ ते ७ पर्यंत दिवसभर महिला भजनी मंडळे करण्यात आले व महाआरती रात्री ८ वाजता या आरती साठी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेण्यात आला असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद बुंदी देण्यात असुन

 

देहूगाव येथील विविध मंदिरांमध्ये श्रीरामभक्त हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. येथील हनुमान समाज मंदिर, मुख्य मंदिर, दक्षिणमुखी काळा मारुती मंदिर तसेच माळवाडी येथील हनुमान मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

विद्युत रोषणाई आणि आकर्षक फुलांची सजावट करण्यात आले होते.दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

शिवाजी चौकातील हनुमान समाज मंदिरात पहाटे पवनसुत,अंजनीपुत्र हनुमान यांचा महाअभिषेक करण्यात आला.

यानंतर श्रींच्या जन्मोत्सवानिमित्त श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी विश्वस्त भानुदास महाराज मोरे यांचे किर्तन झाले . पंचक्रोशीतील सांप्रदायिक भजनी सेवा मंडळांची भजन सेवा सुरू होते.

सायंकाळी महाआरती करण्यात आली. तसेच हनुमान चालीसा आणि सुंदरकांडाचे पठण दिवसभर सुरू होते.

मुख्य मंदिर, दक्षिणमुखी काळा मारुती मंदिर आणि माळवाडी येथील मारुती मंदिर व चिंचोली शनी मंदिरात ही विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने पार पडले.

देहूरोड येथील वैश्य समाज मंदिरातही हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हनुमान चालीसा, सुंदरकांड पठण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page