कलापिनी आणि कै. रजनी नागेश धोपावकर स्मृती एकांकिका महोत्सव संपन्न

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

जागतिक रंगभूमी दिना निमित्त, कै. रजनी नागेश धोपावकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ, कलापिनीच्या कलाकारांनी बसवलेल्या तीन वेगळ्या स्वरूपाच्या एकांकिकांचे सादरीकरण कलापिनी सांस्कृतिक केंद्रात झाले. कार्यक्रमाची सुरुवातीला प्रमुख पाहुण्या स्मिता नाईक, तसेच कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, कार्याध्यक्षा अंजली सहस्रबुद्धे , उपाध्यक्ष अशोक बकरे, धोपावकर ट्रस्ट चे विश्वस्त कौस्तुभ ओक आणि सतीश साठे यांनी नटराज पूजन केले.

अंजली कऱ्हाडकर, विजय कुलकर्णी, ऋचा पोंक्षे ह्यांनी त्यांच्या नाटकाविषयीच्या भावना मनोगतात व्यक्त केल्या. धोपावकर ट्रस्ट तर्फे कौस्तुभ ओक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्या म्हणून मनोगत व्यक्त करताना स्मिता ताई म्हणाल्या, “तळेगावकर नशीबवान आहेत की अशी ५० वर्ष कार्यरत असणारी संस्था इथे आहे.”

ह्यानंतर तीनही नाटकांचे सादरीकरण झाले.

Advertisement

“Right to Pee” पथनाट्य सादर करण्यात आले. कलाकारांच्या आवाहनानुसार कलाकारांनी आणि सर्व उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून स्वच्छतेची शपथ घेतली. हे या एकांकिकेचे मोठे यश आहे.

श्री तशी सौ नाटकात दोनच पात्र…. विजय आणि माधुरी कुलकर्णी . या दोघांनी आपली भूमिका सहज अभिनयाने उत्तम साकारली. भांडण सुद्धा विनोदी अंगाने कसे जाऊ शकते याचे उदाहरणच घालून दिले.

“टेंगशे च्या स्वप्नात ट्रेन” हा दीर्घांक तर १६ कलाकारांचा समावेश असलेला सादरीकरणाचा एक उत्तम नमुना म्हणावा लागेल. कै जयंत पवारांनी लिहिलेलं हे नाटक स्वप्न आणि वास्तव, फ्लॅशबॅक्स, समाजातली संवेदन शून्यता याचं पटकन नं समजणारं मिश्रण. त्यामुळे बसवायला तसं कठीण. पण ते चॅलेंज संदीप समर्थ याने उचललं आणि पेललं देखील.

.सूत्रसंचालन लीना परगी ह्यांनी केले. अंजली सहस्रबुद्धे यांनी सर्वांचे आभार मानले. ध्वनी व्यवस्था सुमेर नंदेश्वर ह्यांची होती तर फोटोग्राफी हितेश शिंदे ह्यांनी सांभाळली. कलामंडळ प्रमुख चेतन शहा, संजय मालकर आणि अन्य सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page