रोटरी क्लबने घातली दु:खावर फुंकर

SHARE NOW

तळेगाव दाभाडे : ‘दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’, असे म्हटले जाते. पण दु:खावर फुंकर घालण्याचे आणि गरजूंना मदतीचा हात देण्याचे काम तळेगावातील सामाजिक संस्थांकडून सातत्याने केले जात आहे. अशाच संवेदनशील कार्याचा आदर्श ठेवत रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीने दिव्यांग उद्योजकाला मदतीचा हात देत मानवतेचे दर्शन घडवले.

दिव्यांगांची सेवा करणे आणि गरजूंना मदत करणे हाच खरा

मानवता धर्म असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक संतोष खांडगे यांनी केले. संस्थेचे माजी अध्यक्ष व दिव्यांग उद्योजक दत्तात्रय पवार यांना इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर स्कूटर वाहन वितरण समारंभात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शाळीग्राम भंडारी होते.

Advertisement

यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रवीण भोसले, सचिव संदीप मगर, रजनीगंधा खांडगे, मिलिंद शेलार, विन्सेंट सालेर, बाळासाहेब शिंदे, सचिन कोळवणकर, अल्पना पवार, पल्लवी पवार, डॉ. दीपाली भंडारी-झंवर, चंद्रकला भुतडा, राधेश्याम भंडारी, ‘घरोंदा’ संस्थेच्या संचालिका आशा राव, प्रशांत दिवेकर तसेच रोटरीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 

मान्यवरांच्या हस्ते दत्तात्रय पवार यांना इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर स्कूटर वाहन प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे त्यांना स्वावलंबनाच्या दिशेने नवी प्रेरणा मिळाली.

प्रवीण भोसले यांनी स्वागत केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधेश्याम भंडारी यांनी केले. बाळासाहेब शिंदे यांनी आभार मानले.

_____________________

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी आणि डॉ. विजया डायग्नोस्टिक सेंटर – भंडारी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

______________


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page