नूतन अभियांत्रिकीमध्ये सावित्रीबाई फुले स्मृतिदिन आणि महिला दिन संयुक्तरित्या साजरा

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (NMIET) येथे १० मार्च २०२६ रोजी सावित्रीबाई फुले स्मृतिदिन आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन संयुक्तरित्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

 

संस्थेचे संचालक डॉ. प्रमोद पाटील यांनी उपस्थितांना शुभेच्छा देऊन महिलांच्या प्रगतीसाठी शिक्षण आणि आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले तसेच संस्थेमध्ये दहा वर्षापेक्षा जास्त सेवा पूर्ण झालेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

Advertisement

 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून नवीन समर्थ विद्यालय च्या मुख्याध्यापिका वासंती काळोखे तसेच मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रणाली गुरव उपस्थित होत्या. महिलांनी कामासोबतच स्वतःच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी, असा महत्त्वपूर्ण संदेश वासंती काळोखे यांनी बोलताना दिला. प्रणाली गुरव यांनी महिलांच्या सन्मान, सक्षमीकरण आणि आरोग्याबाबत जागरूकतेचा सकारात्मक संदेश दिला.

 

कार्यक्रमाचे नियोजन डॉ. सागर जोशी, डॉ. अमोल सोनवणे, प्रा.सिमा महाळुंगकर, डॉ. नीता कऱ्हाडकर आणि प्रा.वर्षा साळवे यांनी केले. या कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page