सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भरले भव्य विज्ञान व कला प्रदर्शन
तळेगाव दाभाडे :

दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान व कला प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. यावर्षी प्रदर्शनाची थीम “सस्टेनेबल डेव्हलपमेंट” अशी होती. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत, पाणी व्यवस्थापन, हरित तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर सुंदर व माहितीपूर्ण प्रकल्प सादर केले. कला विभागात विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्रकला, हस्तकला व सर्जनशील मॉडेल्स प्रदर्शित केली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. संतोष दाभाडे पाटील (तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष) हे होते. सकाळी ८:३० वाजता त्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या कल्पकतेला व परिश्रमांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास शाळेचे सचिव मा. दत्तात्रय नाटक, संचालक मा. अरुण भेगडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दुपारनंतर शाळेत फूड स्टॉल व गेम झोन आयोजित करण्यात आला. विविध स्वादिष्ट पदार्थांचे स्टॉल्स, मजेशीर खेळ, बक्षिसे आणि आनंददायी वातावरण यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनीही कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
यावर्षी “हॉन्टेड हाऊस” हा सर्वांसाठी खास आकर्षण ठरला. रहस्यमय सजावट, रोमांचक वातावरण आणि थरारक अनुभव यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्सुकतेने त्याला भेट दिली.
या कार्यक्रमात सांस्कृतिक विभागाची मानाची ट्रॉफी यावर्षी ब्लू हाऊसने पटकावली. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे व संघभावनेमुळे हा मान त्यांना मिळाला.
शाळेच्या मुख्याध्यापिका मा. रंजिता थंपी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देत तसेच शिक्षकवृंदाला मार्गदर्शन करत संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे आणि अत्यंत सुंदररीत्या पार पाडला. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे कार्यक्रमाला विशेष उंची लाभली.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक यांनी मोठे सहकार्य केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता व संघभावना वाढीस लागते.
कार्यक्रम उत्साह, आनंद आणि शिकण्याचा सुंदर संगम






