मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी नारायण गायकवाड व व्हाईस चेअरमन पदी प्रमोद भोईर यांची बिनविरोध निवड

SHARE NOW

वडगाव मावळ : मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी नारायण गायकवाड व व्हाईस चेअरमन पदी प्रमोद भोईर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी राकेश निखारे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. त्यात पतसंस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी संस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पंचायत समितीचे सदस्या सौ. प्रचीताई देवाभाऊ गायकवाड व सौ. आशाताई मोरमारे तसेच

वडगाव नगरीचे नगरसेवक विशाल वहिले अतुल राऊत प्रवीण मुऱ्हे गुलाबराव डाळिंबकर रघुनाथ वाळुंजकर यांनी नूतन पदाधिकारी यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Advertisement

यावेळी सभागृहात कांब्रे नामा गावाचे उपसरपंच स्वामीभाऊ गायकवाड , मा.विस्तार अधिकारी श्रीम. शोभाताई वहिले ,शिक्षक नेते श्री.बाबासाहेब औटी जिल्हा अध्यक्ष नारायण कांबळे माजी चेअरमन अनिल कळसकर सुरेखा औटी राहुल जाधव संदीप सपकाळ आण्णासाहेब ओहोळ यशवंत काळे राहुल लंबाते राकेश चांदोरकर निर्मला काळे बाळासाहेब घारे संजय ठुले मनोज भांगरे अतुल वाघ गेणु मोरमारे हरिभाऊ आडकर नितीन वाघमारे गणेश धीवार संगीता शिरसट शिक्षक भारतीचे नेते विलास मोरे गोरख जांभूळकर अध्यक्ष राजेंद्र शेंडे संतोष राणे संतोष शेटे मधुकर दळवी गणेश ठोंबरे महादू केदारी काळुराम थरकुडे हिराजी कुडव व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.पतसंस्थेचे सुमारे ७०० सभासद असून, कर्ज वाटप ५४ कोटी रुपये तर मुदत ठेवी १४ कोटी रुपये असून, सुमारे ५५ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे.

सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी पतसंथेचा कारभार सभासद हिताचा व अधिक पारदर्शकपणे करुन पतसंस्था स्वबळावर आणण्यासाठी सर्व संचालक मंडळ प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली.

सूत्रसंचलन प्रमोद गायकवाड यांनी केले व उपस्थितांचे आभार राहुल जाधव यांनी मानले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page