पीएमआरडीए च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची ‘विष्णू’ अवतारात वसुली… आयुक्त कारवाई करणार का? नागरिकांमधून संताप उलटसुलट चर्चांना उधाण.
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, आणि आजूबाजूच्या २५ हून अधिक तालुक्यांतील गावे व शहरांत PMRDA काम करत असून नवीन टाऊनशिप, मेट्रो, रस्ते, रिंगरोड, इ. प्रकल्प नागरिकांना सुविधा प्राप्त करून देणे अशी अनेक कामे पीएमआरडीए कडून केली जातात. परंतु मागील अनेक दिवसापासून मांजरी व वाघोली व आजूबाजूला असणाऱ्या परिसरातील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामधील अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागातील एक “कंत्राटी कनिष्ठ अभियंता” हा मांजरी, वाघोली व आजूबाजूच्या परिसरांमध्ये राज रोज पणे ‘विष्णू’ अवतारात वसली करत असून… त्याला शासनाने नेमून दिलेली कामे सोडूद यातच ‘आवड’ निर्माण झाली आहे.
दररोज पंधरा ते वीस अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून संबंधित बांधकाम धारकांना नोटीस काढण्याची धमकी देणे, तसेच जे लोक त्यांच्या धमकीला प्रतिसाद देतात अशा नागरिकांशी संध्याकाळी संगनमताने मीटिंग करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने बांधकाम धारकांकडे आर्थिक पैशांची मागणी करणे असे कारनामे हा अधिकारी करत आहे.जे बांधकाम धारक पैसे देतात त्यांची नोटीस ते काढत नाहीत व जे पैसे देत नाहीत त्यांना वारंवार नोटीस काढण्याची धमकी देतात.
या अधिकाऱ्याच्या बऱ्याच तक्रारी नागरिकांकडून येत असून त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची व पीएमआरडीए ची प्रतिमा मलीन होत असल्याने या (कंत्राटी) कनिष्ठ अभियंत्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी या परिसरातून होत आहे. अन्यथा नागरिकांकडून आंदोलनाचा पवित्रा उभारण्यात येणार आहे.






