अरुण खन्ना यांचा उपक्रम: ग्रामीण रुग्णालयाला २४०० इंजेक्शनचा जीवनदायी पुरवठा
पवनानगर : सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत मावळ तालुक्यातील वारू गावचे रहिवासी, विवाल्डीस कंपनीचे डायरेक्टर अरुण खन्ना यांनी पवनानगर परिसरातील ग्रामीण रुग्णालय, काले कॉलनी येथे स्वखर्चाने तब्बल २४०० इंजेक्शनचा पुरवठा करून आरोग्य सेवेला मोठा दिलासा दिला आहे.
सध्या ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांना उपचारात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर अरुण खन्ना यांनी इंजेक्शन Ceftriaxone 1 gm १२००, Pan 40 mg १२०० असे एकूण २४०० इंजेक्शन उपलब्ध करून दिले, ज्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या गरजू रुग्णांना योग्यवेळी उपचार मिळणार आहेत.
स्थानिक नागरिक व रुग्णालय प्रशासनाने या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले असून, “समाजातील उद्योगपती आणि दानशूर व्यक्तींनी अशा प्रकारे मदतीचा हात पुढे केल्यास आरोग्य सेवेची गुणवत्ता निश्चितच उंचावेल,” असे मत व्यक्त केले.
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम आदर्श ठरला असून, यामुळे अनेक रुग्णांना नवा जीवनदायी आधार मिळणार आहे.






