“पुणे कालचे आणि आजचे” या विषयावर त्रिमूर्ती मित्र मंडळाचा देखावा

SHARE NOW

पुणे प्रतिनिधी :

पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विविध देखावे आणि सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा होत आहे. मध्यवर्ती भागातील मंडळांनी सादर केलेले आकर्षक देखावे नागरिकांना मंत्रमुग्ध करत आहेत. कसबा पेठ माणिक चौक येथील त्रिमूर्ती मित्र मंडळ यांनी यावर्षी “पुणे कालचे आणि आजचे” या विषयावर देखावा साकारला असून, गणेशभक्तांना समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश दिला आहे.

या देखाव्यातून पुण्यातील वाढती गुन्हेगारी व अंमली पदार्थांच्या सेवनाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. “उडता पुणे होऊ देणार नाही” ही प्रभावी प्रतिज्ञा नागरिकांना विचार करायला भाग पाडणारी ठरली आहे.

 

देखावा पाहण्यासाठी आमदार हेमंत रासने यांनी भेट दिली आणि मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

मंडळाची वैशिष्ट्ये

वर्गणी सक्ती नाही

विसर्जन मिरवणूक नाही

गुलाल उधळण नाही

दहा दिवस कर्णकर्कश ध्वनीक्षेपक नाही

दरवर्षी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते

मंडळाची स्थापना १९८४ मध्ये झाली असून, त्यांचे घोषवाक्य आहे –
“ठेवा उत्सवाचे भान, राखा हिंदुत्वाची शान”

Advertisement

यावर्षी दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. गणेशोत्सवाबरोबरच वर्षभर मंडळ सामाजिक उपक्रम राबविते.
यामध्ये –

गोरगरिबांना दिवाळी फराळ वाटप

दिव्यांगांना मदतीचा हात

अनाथाश्रमांना आधार

पर्यावरण संवर्धन

ज्येष्ठ नागरिकांची काळजी

“हे विश्वची माझे घर” या संत ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे हे मंडळ कार्यरत असून, “समाजाचे आपण काही देणे लागतो” याची जाणीव त्यांच्याकडून सतत दिसून येते.

या वेळी देखावा पाहण्यासाठी विदेशी पाहुण्यांनीही हजेरी लावली होती.

मंडळातील पदाधिकारी

कार्याध्यक्ष – डॉ. विजय पोटफोडे

अध्यक्ष – विनय चाळणीवाले

उत्सवप्रमुख – सागर घम

सभासद – सुरेशकाका पोटफोडे, प्रवीण वडके, उल्हास पोरे, विजय रोकडे, दिलीप मुळे, आनंद काटीकर, अमित जाधव, अंगद कुलकर्णी, मंगेश डोंगरे, सचिन लगड, अनिकेत सोनावणे, शेखर नागपुरे, संदीप चुंबळकर, छोटू वडके, ओंकार रोकडे, नितिन वाईकर, विवेक गोडांबे, महेश पिंपळे, राजू मेटे, प्रशांत बाचल, कुणाल वडके, दीपक भाटलेकर, सिद्धार्थ पोटफोडे.

हा देखावा सांस्कृतिक वारसा, सामाजिक संदेश आणि पुण्याच्या बदलत्या रूपाची कहाणी मांडणारा ठरला आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page