यश मिळविण्यासाठी नियोजन महत्वाचे -प्रा.मा.श्री. तुकाराम जाधव.
तळेगाव दाभाडे
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता बारावी कला,वाणिज्य व तंत्र शिक्षण विभागाचा “सदिच्छा समारंभ” या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना युनिक अकॅडमीचे संस्थापक संचालक माननीय.श्री.प्राध्यापक तुकाराम जाधव सर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी नियोजन महत्त्वाचे असते.तुम्ही सर्व विद्यार्थी महत्त्वाच्या टप्प्यावर असून पुढील चार वर्षे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असतात.प्रत्येक शाखा निहाय वेगवेगळे करियर असते. परंतु एमपीएससी,यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी सर्व शाखांसाठी सामायिक परीक्षा असते. सरकारी सेवेत जाण्यासाठी आयोगाकडून विविध पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात.यूपीएससी परीक्षा ही 1750 गुणांची असते.प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना विषयाचे आकलन होणे महत्त्वाचे असते. नियमित परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा यामध्ये फरक असल्याचे सरांनी सांगितले. स्पर्धा परीक्षेतील प्रश्नांची पर्यायी उत्तरेही विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारी असतात. त्यासाठी परीक्षार्थींची उत्तम तयारी असली पाहिजे. असे मत प्राध्यापक तुकाराम जाधव सर यांनी व्यक्त केले. सर्व बारावीला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के मलघे सर यांनी पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यावेळी प्राचार्यांनी इंद्रायणी महाविद्यालयाचे एमपीएससी व यूपीएससी केंद्र आणि युनिक अकॅडमी यांच्यात एक करार होऊन आज युनिक अकॅडमीचे संस्थापक संचालक माननीय. श्री. तुकाराम जाधव सर यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांविषयीची माहिती घेतल्याचे प्राचार्य.डॉ. मलघे सर यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह माननीय. श्री.चंद्रकांतजी शेटे साहेब यांनी मावळ तालुक्यातील इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी नेहमीच अव्वल स्थानावर असल्याचे सांगितले.श्री. तुकाराम जाधव सर यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना नक्कीच स्पर्धा परीक्षांचा उलगडा झाला.असे मत शेटे साहेब यांनी व्यक्त केले. यावेळी शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले त्या सर्व विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रत्येक विभागातील विद्यार्थ्यांनी कॉलेज विषयीच्या व शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रम प्रसंगी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य.डॉ.संजय आरोटे सर,इंजीनियरिंग मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉ. रुपेश पाटील सर सर्व कनिष्ठ, वरिष्ठ विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक. ए .एम.जगताप सर यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक.आर.आर.डोके सर यांनी करून दिला.व आभार इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्राध्यापक. एस .पी. भोसले सर यांनी मानले. दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कृष्ट असेआयोजन केले होते.सर्वांच्या सहकार्यामुळे इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील कला,वाणिज्य व तंत्र शिक्षण विभागाचा” सदिच्छा समारंभ कार्यक्रम” उत्साहात पार पडला.







