तळेगाव दाभाडेत ‘फारश्पिलेर्न ट्रेफेन’ कार्यक्रम जल्लोषात साजरा जर्मन भाषा अध्यापनात फारश्पिलेर्न अकादमीचे भरीव योगदान : सुरेश साखवळकर

SHARE NOW

 

तळेगाव दाभाडे:संस्कृतमुळे भारताचे जर्मनीशी सर्वाधिक जिव्हाळ्याचे नाते आहे. त्याचाच धागा धरून येथील फारश्पिलेर्न अकादमीचे संचालक ऋता वळवडे आणि श्रीधर वळवडे यांनी जर्मन भाषेच्या अध्यापनातून गेली दोन दशके भरीव योगदान दिले आहे. भाषेच्या माध्यमातून मराठी आणि जर्मनीमधील विद्यार्थ्यांकडून एकमेकांच्या संस्कृत्यांचे आदानप्रदान होत असून जर्मन भाषेवर प्रभुत्व मिळवून त्यांच्या मराठी भाषक विद्यार्थ्यांनी करिअरमध्ये घेतलेली आंतरराष्ट्रीय झेप कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन बहुभाषिक ब्राह्मण संघ मावळचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर यांनी येथे केले.

कै.शं. वा. परांजपे कलापिनी नाट्यसंकुलात येथील फारश्पिलेर्न अकादमीतर्फे रविवारी आयोजित ‘फारश्पिलेर्न ट्रेफेन’ कार्यक्रमाच्या (स्नेहसंमेलन) अध्यक्षस्थानी सुरेश साखवळकर होते. भारत सरकारच्या उपक्रमातंर्गत काम करणा-या डाड संस्थेच्या विभागीय अधिकारी गिरीजा जोशी, माजी नगराध्यक्ष अॅड. रवींद्र दाभाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दोन्ही देशातील संस्थांनी तयार केलेल्या ‘युरोप स्टडी टूर्स’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दक्षा ओक हिला फारश्पिलेर्न अकादमी बेस्ट स्टुडंस्टस् अवॉर्ड प्रदान करण्यात आला.

भारतीय विद्यार्थ्यांना जर्मनीतील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणाच्या संधी मिळवून देण्यासाठी असलेल्या संस्थेच्या कार्याची माहिती गिरीजा जोशी यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या, की फारश्पिलेर्न अकादमीच्या संचालक रूचा वळवडे आणि श्रीधर वळवडे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी जर्मन भाषेच्या शिक्षणाबरोबरच सेवाभावीवृत्तीने विविध उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीयस्तरावर मराठी-जर्मन भाषी विद्यार्थ्यांनी करिअरमध्ये आघाडी घेतली आहे.

Advertisement

संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना निसर्गाचे संवर्धन व श्रमदानाचे उपक्रम, मराठी-जर्मन भाषेतील सांस्कृतिक कार्यक्रम आणि जर्मन भाषिक देशांच्या अभ्यास सहली आदि उपक्रमांची माहिती संस्थेच्या संचालक रूचा वळवडे यांनी प्रास्ताविकात दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, भरतनाट्यम, जर्मन-मराठी समउच्चारित शब्दांवरील प्रहसन, नाटिका आणि नृत्यरचना सादर केल्या. कार्यक्रमाची सांगता भैरवीने झाली. कार्यक्रमाचे संयोजन रचना वळवडे आणि सहकारी विद्यार्थ्यांनी केले. श्रीधर वळवडे यांनी आभार मानले.

बेस्ट स्टुडंस्टस् पुरस्कार विजेते:-

बेस्ट स्टुडंट ऑफ अकादमी:- दक्षा ओक, थ्री पीलर्स ऑफ अकादमी:- अंबरीश कुलकर्णी, हिमांशू जयस्वाल, अथर्व अरगडे. बेस्ट बॅच:- चिन्मय जोशी, ऋतिका तोत्रे, मुग्धा साळवी, शताक्षी खांडेभरड, हर्षल बुजखुले, सायी जोशी, अमोघ वर्तले.

सी-1 हायेस्ट लेव्हल- प्रणीत सोनीगरा, टॉप स्कोअरर्स:- शुभम फलके, तेजस भेगडे, स्वरांगी शेटे, ऋतिका तोत्रे, चिन्मय जोशी, माधवी

 संयोजन समिती सदस्य: अंबरीश कुलकर्णी, दक्षा ओक, अथर्व अरगडे, हिमांशू जयस्वाल, अक्षिता राव, चिन्मय जोशी, तेजस भेगडे, भैरवी बेनाडीकर , मुग्धा साळवी, काव्या बिडकर, जान्हवी भिडे, अभिलाषा राजे, तुषिता शहा, आर्या सांडभोर, सई जोशी , अमोघ वर्तले, विनीत पारखे, रेवती कुलकर्णी, हर्षल बुडखुले , अनिशा राव, स्वरांगी शेटे , शताक्षी खांडेभरड, शिवम घंटी , धैर्य वाघ , कृतिका तोत्रे , उत्तरा फाकटकर , प्रणित सोनिग्रा , प्रज्ञा टेंभेकर , कौस्तुभ उपाध्ये


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page