निधन वार्ता श्रीमती वर्षाताई पद्माकर किबे यांचे दुःखद निधन

SHARE NOW

तळेगाव दाभाडे : श्रीमती वर्षाताई पद्माकर किबे यांचे दुःखद निधन

तळेगाव दाभाडे येथील स्वराज्यनगरी परिसरातील रहिवासी तसेच पैसा फंड जनरल हॉस्पिटल आणि इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. पद्माकर किवे यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती वर्षाताई पद्माकर किबे यांचे आज, बुधवार (१५ जुलै) रोजी सकाळी ९.३० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

 

त्यांच्या निधनाने किबे , कानिटकर व वैद्य परिवारावर शोककळा पसरली असून सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे. शांत, प्रेमळ व सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणून त्या सर्वांच्या परिचयाच्या होत्या.

Advertisement

 

त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी १२ वाजता स्वराज्यनगरी, तळेगाव दाभाडे येथील राहत्या घरापासून निघणार असून, बनेश्वर स्मशानभूमी, तळेगाव दाभाडे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना, नातवंडे तसेच आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे.

 

‘सतर्क महाराष्ट्र’ परिवारातर्फे स्वर्गीय श्रीमती वर्षाताई पद्माकर किबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो व किवे परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page