विश्वकमल महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा (2025-26) उत्साहात संपन्न:

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

 

दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी विश्वकमल महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या अध्यक्षा सौ. सारिका संजय भेगडे मॅडम तसेच संचालक श्री. विश्वजीत संजय भेगडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी राजमाता जिजाऊ महिला मंचच्या सदस्या सौ. सायली बोत्रे, सौ. सुमित्रा जाधव व सौ. सीमा देशमुख उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वनस्पतिशास्त्र विषयात पीएच.डी. धारक डॉ. राहुल मुंगिकार व त्यांची पत्नी सौ. मुंगिकार उपस्थित होते.

 

तसेच प्रा. मंगेश कदम (बीसीए-एमसीए विभाग, एनएमआयईटी), श्री. राजेंद्र लांडगे (क्रीडा समन्वयक, एनएमआयईटी), प्राचार्य डॉ. निशांत पाचपोर, प्रा. मैत्री वाघमारे, कु. नेहा राठोड तसेच श्री. राजेश उंडे व इतर प्राध्यापक वर्ग यांचीही मान्यवर उपस्थिती लाभली.

Advertisement

 

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर राजमाता जिजाऊ यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. पुढे सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. राहुल मुंगिकार यांनी विद्यार्थ्यांना क्वांटम फिजिक्स, सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षा या विषयांबाबत मार्गदर्शन करत आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित केले, अध्यक्षा सौ. सारिका भेगडे व प्राचार्य डॉ. निशांत पाचपोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणे केली. त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीबरोबरच सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

 

यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. पुढे विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. आकर्षक नृत्यप्रस्तुतींनी कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली.

 

कार्यक्रमाच्या शेवटी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल आयोजक व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page