शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप!!
तळेगाव दाभाडे:
दिनांक 21 जानेवारी 2025. रोजी यशवंतराव चव्हाण माध्यमिक आश्रम शाळा भोसरी येथील 190 विद्यार्थ्यांना कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल तळेगाव दाभाडे तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम ही शाळा अनेक वर्षापासून सामाजिक ,पर्यावरण क्षेत्रामध्ये मोलाचे कार्य करत आहे. गेल्या काही वर्षापासून शाळेने एक सुंदर उपक्रम शाळेमध्ये राबवला आहे.शाळेतील विद्यार्थ्यांनी वाढदिवसा निमित्त शाळेत चॉकलेट न वाटता ज्यांना जितकं शक्य आहे तितकं शैक्षणिक साहित्य शाळेमध्ये जमा करण्याचे व ते साहित्य समाजातील गरजू विद्यार्थ्यांना देण्याचे काम करत आहे.
जमा झालेले हे साहित्य समाजातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य शाळा अनेक वर्षापासून करत आहे. या उपक्रमात संस्थेचा तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका ,शाळेचे शिक्षक ,विद्यार्थी व पालकांचाही खूप मोठा वाटा आहे.
अस विधायक व समाजाप्रती आपले कर्तव्य निभावण्याचा हा संस्कार शाळेतूनच विद्यार्थ्यांना झाला.तर नक्कीच पुढची पिढी सुजाण आणि समाजभान राखणारी नक्कीच होईल.
हे साहित्य यशवंतराव चव्हाण माध्यमिक आश्रम शाळा येथील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले.
आज कृष्णराव भेगडे स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती सावंत व श्री.अजित भाकरे सर यांनी संस्थेच्या वतीने शालेय शैक्षणिक साहित्य यशवंतराव चव्हाण माध्यमिक आश्रम शाळेकडे सुपूर्त केले.यशवंतराव शाळेचे संचालक संदीप राक्षे सर, मुख्याध्यापक श्री.शिंदे सर,श्री.खोपडे सर ,श्री.देशमुख सर, श्री.कदम सर, सौ.स्वाती सलोट, आरंभ फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.वैष्णवी पाटील, श्री.तानाजी भोसले उपस्थित होते. त्यावेळी मुलांचा चेहऱ्यावरचा आनंद अविस्मरणीय होता. शाळेनेही सर्वांचे आभार मानत मान्यवरांचा सत्कार केला.